Pune BJP : पुण्यातील भाजप नेत्याला उपरती; रुग्णालयाला दिलेले वडिलांचे नाव काढले, CM फडणवीस उद्घाटनाला आले अन्...

Shrinath Bhimale Cancer Hospital Devendra Fadnavis : स्वर्गीय प्रा. यशवंतराव भिमाले कर्करोग रुग्णालय, असा फलक रुग्णालयाच्या इमारतीवर काल लावण्यात आला होता.
Shrinath Bhimale .jpg
Shrinath Bhimale .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बाणेर येथे पुणे महापालिकेतर्फे पीपीपी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या कर्करोग रुग्णालयाला स्थायी समितीचे अध्यक्ष, भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी त्यांचे वडील स्वर्गीय प्रा. यशवंतराव भिमाले यांचे नाव दिल्याचा फलक अचानक रुग्णालयाला लावला. मात्र यावर चहूबाजूने टीकेची जोड उठल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूर्वी हा फलक काढून  टाकण्यात आल्याने भिमाले यांना उपरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात आज दैनिक 'सकाळ'ने 'आज 'पैसे करदात्यांचे, टिमकी मात्र नेत्यांची'' या मथळ्याखाली आज वृत्त प्रकाशित करून हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. याची दखल घेऊन फलक काढण्यात आलेला आहे.

शहरात कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिका आणि आपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने १५० खाटांचे अत्याधुनिक कर्करोग आणि हृदयविकार रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्यास कोणत्याही व्यक्तीचे नाव देण्याचा निर्णय झालेला नाही.

महापालिकेने उद्घाटन कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत देखील भिमाले यांच्या वडिलांच्या उल्लेख नाही. असे असतानाही शनिवारी संध्याकाळी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी  ‘पुणे महापालिका आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमाचे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर स्वर्गीय प्रा. यशवंतराव भिमाले कर्करोग रुग्णालय’ असा फलक रुग्णालयाच्या इमारतीवर लावण्यास प्रशासनाला भाग  पाडले.

हे नाव देण्यावरून भाजपमध्ये एक मत झालेले नव्हते. अनेक नगरसेवकांना याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती असे असताना भिमाले यांनी वडिलांच्या नावाचा आग्रह धरल्याने पक्षात कुरबुरी सुरू झालेली होती. तरीही भिमाले यांनी हट्ट करून हा फलक लावून घेतला होता.

Shrinath Bhimale .jpg
Pune BJP Politics: पुण्यातील नव्या कॅन्सर हॉस्पिटलला स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या वडिलांचं नाव: भाजपच्या भिमालेंनी गुपचूप उरकले नामकरण?

श्रीनाथ भिमाले यांनी यापूर्वी सॅलिसबरी ‌पार्क येथील उद्यानाला स्वतःच्या वडिलांचे आणि आईचे नाव दिलेले आहे. भिमाले यांच्या वडिलांचे नाव देण्यास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केलेला होता. त्या विरोधात पक्षाचे नेत्यांकडे देखील तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. असे असताना भिमाले यांनी आता बाणेर येथील कर्करोग रुग्णालयाला स्वतःच्या वडिलांचे नाव दिल्याचे समजताच पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विनिता देशमुख, विजय कुंभार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी त्यावर टीकेची जोड उठवली.

''कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री फडणवीस यांना यायचे असेल तर त्यापूर्वी या रुग्णालयाला लावलेला फलक हटवावा'' अशी मागणी करण्यात आलेली होती. या विषयावरून वादंग निर्माण होणार हे लक्षात आल्यानंतर पक्षातील नेत्यांनी भिमाले यांना हा फलक काढून टाकण्याची सूचना केली.

फलक काढण्याची नामुष्की

मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यापूर्वी हा फलक काढून टाकण्यात आला. आणि त्या ठिकाणी 'पुणे महापालिका आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भारतीय तत्त्वावर कर्करोग रुग्णालय' असा नवीन फलक लावण्यात आलेला आहे.

भिमाले यांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेत असलेल्या शक्तीचा वापर करून सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाचे नाव अजूनही कायम ठेवलेले आहे. पण बाणेर येथील कर्करोग रुग्णालयाला दिलेले वडिलांचे नाव नागरिकांच्या टिके नंतर काढून टाकण्याची नामुष्की आलेली आहे.

Shrinath Bhimale .jpg
Pune BJP : पुण्यात भाजपच्या 'झेरॉक्स नगरसेवकांचा' दबदबा वाढला; दमदाटीपुढे अधिकारी हतबल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com