Vinod Tawde : भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीतून विनोद तावडे बाहेर? डिसेंबरमध्ये नवीन अध्यक्षाची घोषणा

Vinod Tawde BJP president : राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे यांनी आपला ठसा उमटवला आहे. नितीश कुमारांना पुन्हा भाजपसोबत घेण्यात तावडेंचा मोठा वाटा आहे.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Vinod Tawde News : लोकसभेच्या निकालाआधीच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची मुदत संपली होती. मात्र, निवडणुकीमुळे ते अध्यक्षपदावर कायम होते. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात नड्डा यांचा समावेश झाल्याने भाजपला नवीन अध्यक्ष मिळणार हे निश्चित झाले होते. अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, विनोद तावडे हे भाजपचे अध्यक्ष होणार नसल्याची शक्यता आहे.

भाजपने राज्यांचे प्रभारी घोषित केले आहेत. बिहारच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची पुन्हा निवड केली आहे. त्यामुळे तावडे हे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसतील, अशा चर्चा आहेत.

राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे Vinod Tawde यांनी आपला ठसा उमटवला आहे. नितीश कुमारांना पुन्हा भाजपसोबत घेण्यात तावडेंचा मोठा वाटा आहे. नितीश कुमार युपीएसोबत असल्याचा फायदा देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत झाल्याचे बिहारमध्ये दिसून येत आहे.

Vinod Tawde
Eknath Shinde News : जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत दिसेल; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

विनोद तावडे यांचे राष्ट्रीय राजकारणात वाढत चाललेले महत्त्व आणि अमित शाह Amit Shah, नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यावरील विश्वास यामुळे विनोद तावडे भाजपचे पुढील अध्यक्ष असतील अशा चर्चांना सुरुवात झाली होती.मात्र, विनोद तावडेंवर पुन्हा बिहाराची जबाबदारी टाकल्यामुळे बिहार विधानसभेची निवडणुकीपर्यंत ते या पदावर कायम असण्याची शक्यता आहे.

निवडणुकीनंतर अध्यक्षाची निवड

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भाजपच्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता नाही. मंत्रिपदासोबतच भाजप अध्यक्षपदाचा कार्यभार हा जेपी नड्डा यांच्याकडेच असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे.

Vinod Tawde
Manoj Jarange : विधानसभा निवडणूक लढवण्याची वेळ आली तर..; मनोज जरांगेंनी सांगितला 'प्लॅन'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com