

नवी दिल्ली : त्रिपुरा (Tripura) घटनेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील अमरावती (Amaravati) जिल्ह्यात दोन दिवस हिंसाचार उफाळला होता. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एका धार्मिक कार्यक्रमात मशिदीची (mosque) तोडफोड केल्याची अफवा सोशल मीडियात पसरली. या घटनेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटले. मात्र सोशल मीडियातील पोस्ट पाहता, त्याठिकाणी मोडफोड, बलात्कार, मृत्यू अथवा कुणालाही जखमी करण्याची घटना त्रिपुरात घडली नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
त्रिपुरातील हिंसात्मक घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत गुरुवारी (१२ नोव्हेंबर) मुस्लिम समाजाने मोर्चा काढला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. मात्र अचानक या घटनाक्रमाला हिंसक वळण लागलं. त्याच्या निषेधार्थ शनिवारी भाजपने अमरावती बंदचं आवाहन केलं. मात्र काल देखील अमरावतीत या बंदमध्ये पुन्हा हिंसाचार झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आज परिस्थिती नियंत्रणात असली तरी संपुर्ण जिल्ह्याची इंटनेट सेवा बंद करण्यात आली आहे. लोकांनी शांतता राखावी तसेच अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीला बळी पडू नये. ही घटना ही खूपच चिंताजनक बाब आहे,त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं आहे.
- नेमकं काय आहे प्रकरण ?
गेल्या दोन आठवड्यांपुर्वी उत्तर त्रिपुरात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोडीची घटना घडली. त्यानंतर त्रिपुरातील सर्व मशिदींचा सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती तेथील पोलीस महासंचालक व्हीएस यादव यांनी दिली. तसेच, तुरळक घटना वगळता उत्तर त्रिपुरामध्ये परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे सांगितले होते. पण त्रिपुरामध्ये मशिदीत तोडफोड झाल्याची अफवा पसरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रात मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत या मोर्च्यााला हिंसक वळण लागलं. त्याच्या निषेधार्थ भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी काल शनिवारी अमरावती बंदची हाक दिली. त्या बंदला देखील हिंसक वळण लागलं. यामध्ये काही गाड्यांची. दुकांनांची तोडफोड करण्यात आली. जी दुकाने, कार्यालये बंद करण्यात आली. जय श्रीरामच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.