Beed Crime : बीडमध्ये आणखी एक सून्न करणारी घटना? भाजप कार्यकर्त्याने एकाला बॅटने फोडले, व्हिडीओ व्हायरल

BJP in Beed : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलेलं असतानाच आता दुसरी आणखी एक सून्न करणारी घटना समोर आली आहे. येथे भाजप कार्यकर्त्याने एकास बेदम मारहाण केली आहे.
suresh dhas On Beed Crime
suresh dhas On Beed Crimesarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडच्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या अमानुष मारहाण करून झाली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले होते. तर याच प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पण आता अशाच दोन अमानुष मारहाणीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात असून याचे पडसाद आज विधीमंडळात उमटण्याची शक्यता आहे. जालन्यातील भोकरदन आणि बीडमधील शिरुर येथे झालेल्या मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे बीडमधील शिरुर येथे झालेली मारहाण एका भाजप कार्यकर्त्याने केली असून तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.

राज्यात एकीकडे संतोष देशमुख हत्याकाडांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जातेय. तसेच आरोपींच्या फाशीची मागणी केली जातेय. अशातच जालन्यातील भोकरदन आणि बीडमधील शिरुरमधील मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे विधानभवन परिसरात याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून विरोधक या दोन्ही घटनांवरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे.

बीडमधील देशमुख हत्याप्रकरण ताजे असतानाच बीडच्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे बीडमधील गुन्हेगारीचे सत्राला ब्रेक लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ज्या भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याला आका म्हणत त्याच्या दहशतीला चाप लावली त्यांच्याच कार्यकर्त्याने आता दहशत निर्माण केलीय. भाजप कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले याने मित्राच्या पत्नीची छेडछाड केल्याचे कारण देत एकाला बेदम मारहाण केली आहे. यामुळे आता सुरेश धस चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसले कुख्यात गुंड असून भाजप पदाधिकारी आहे. त्याने एका व्यक्तिला जबर मारहान केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने आता खळबळ उडाली आहे. यावरून त्याने स्वत: बीडमधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती दिली. यावेळी त्याने, त्या व्यक्तीने माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली, म्हणून मी मारहाण केल्याचे म्हटलं आहे.

suresh dhas On Beed Crime
Suresh Dhas : धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादी 'क्लिन बोल्ड', सगळे स्टंप...; सुरेश धसांनी अजितदादांना डिवचलं

तसेच "मी कबूल करतोय की, मी मारहाण केलीय पण याचे कारण वेगळे असून त्याने मित्राच्या बायकोची छेड काढली. याच रागातून त्याला मी मारहाण केलीय. मला पोलिसात जायला हवं होतं. मात्र ती वेळ नव्हती. मला राग आला होता, म्हणून मारहाण केली. कुठल्याही मुली आणि महिलांची छेड काढल्यावर मी कसा शांत बसणार? मला जे योग्य वाटलं ते मी केलं”, असेही सतीश भोसले याने म्हटलं आहे.

"मी पारधी समाजातील लहान कार्यकर्ता असून मी गुंड आणि दहशत माजवणारा नाही. माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली जातेय. मी गुन्हेगार नसून जी कारवाई होईल ती मी घेईन, असेही त्याने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यात भाजप कार्यकर्त्या सतीश भोसले याने बॅटने मारहाण केलीय. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असून त्यांच्यासमोरच मारहाण करण्यात आली आहे. सतीश भोसले याने त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली आहे. याचे आता व्हिडीओत व्हायरल होत आहेत.

suresh dhas On Beed Crime
Suresh Dhas Vs NCP : आता सुरेश धस यांना सुटी नाही, आता कुठं उजडेल तिथं उजडेल; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने एल्गार पुकारला

कोणाही असो कारवाई करा

दरम्यान आता सुरेश धस यांनी मारहाण करणारी व्यक्ती त्यांचा कार्यकर्ता असल्याचे मान्य केलं आहे. तर तो कोणाही असला तरीही कारवाई करा. संबंधित घटनेची माहिती पोलिसांकडून घेतली असून ही घटना दीड वर्षांपूर्वीची आहे. तर मुलीची छेड काढण्यावरून ही मारहाण झाली होती". पण आता तक्रार आल्यास कारवाई करा असेही आपण पोलिसांना आदेश दिल्याचे सुरेश धस यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com