Vote Chori : उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची निवड व्होट चोरीतून; काळा पैसा, ब्लॅकमेलिंगचा वापर ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

C P Radhakrishnan Vice President Election : सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाली आहे. मात्र, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत व्होट चोरी झाल्याचे भाजप, शिंदे गटाने मान्य केल्याचा दावा 'सामना'तून करण्यात आला आहे.
Vice President election 2025
Vice President election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन विजयी झाले. तर, विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी पराभूत झाले. मात्र, या निवडणुकीत विरोधकांची 15 मतं फूटल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील खासदार फूटले, आपचे खासदार फूटले अशी चर्चा आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे राधाकृष्णन यांच्या विजयाचे श्रेय स्वतःकडे घेतलेच. महाविकास आघाडीला स्वतःची मते राखता आली नाहीत वगैरे भाष्य केले. मिंधे गटाचे लोक म्हणतात, महाविकास आघाडीत फूट पाडून आम्ही खासदारांची मते राधाकृष्णन यांच्याकडे वळवली, देशाच्या संवैधानिक पदासाठीम्हणजे उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत या लोकांनी सौदेबाजार केल्याची कबुली दिली.', असे 'सामना'तून म्हटले आहे.

पुढे म्हटले आहे की, 'या लोकांनी सौदेबाजार केल्याची कबुली दिली असेल तर भारताचा निवडणूक आयोग घोरत पडला आहे काय? निवडणूक आयोग उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांतही गांभीर्याने काम करीत नाही. व्होट चोरीचा खेळ येथेही होऊ दिला जातोय. हे असे खरेच घडले असे एकवेळ मान्य केले तर संघाचे उमेदवार असलेले सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी झालेली निवड व्होट चोरीतून झाली आहे. त्यासाठी काळा पैसा, ब्लॅकमेलिंग, धमक्यांचा वापर झाला.'

Vice President election 2025
Shankaracharya Avimukteshwaranand: '...म्हणून नेपाळ अन् भारतात पुन्हा राजेशाही लागू व्हावी!'; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं धक्कादायक विधान

बेइमानीचे शेण खाल्ले नाही

मतदान हे पूर्णपणे गुप्त असताना अशा महत्त्वाच्या निवडणुकीत 'मते' फोडणे हे भाजप काळात किती सोपे बनले आहे ते यावेळी दिसले. भाजप व त्यांचे मित्रपक्ष 'फोडाफोडी'वर कितीही बोलत असले तरी दोन-पाच वगळता इतर कोणी बेइमानीचे शेण खाल्ले असेल असे दिसत नाही. ज्यांनी 'क्रॉस व्होटिंग' केले त्या अंतरात्म्यांच्या आत्मारामांनी म्हणे तत्काळ परदेश गमन केले व त्यांच्या परदेशवारीची सर्व व्यवस्था भाजपच्या लाडक्या उद्योगपतींनी केल्याची वार्ता भाजप गोटातूनच वाऱ्यासारखी पसरवली गेली. हेसुद्धा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रतिष्ठा राखणारे नाही, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे.

Vice President election 2025
Bihar Election 2025: "कोणी दारु प्यायला नेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करु नये"; केंद्रीय मंत्र्याची अजब मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com