
Varanasi News: नेपाळमध्ये वाढता भ्रष्टाचार आणि सर्वच सोशल मीडियावर घालण्यात आलेली बंदीमुळे प्रचंड मोठा हिंसाचार पेटला आहे. या देशातील gen झींनी आंदोलनाची सूत्रे हातात घेत थेट राजधानी काठमांडूच ताब्यात घेतली. त्यांनी संसद, न्यायालय पेटवून देत मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड करत आहे. या नेपाळमधील अराजकतेनंतर ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धक्कादायक मागणी केली आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती(Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी गुरुवारी(ता.11) वाराणसीत मोठं विधान केलं आहे.त्यांनी नेपाळमध्ये लोकशाहीच्या जागी पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी केली आहे. या त्यांच्या मागणीनंतर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
शंकराचार्य म्हणाले, हिंदू समाजाची शासन व्यवस्था राजेशाही आहे. यामुळे जगात किमान एक जागा तरी अशी असावी जेथे वेदमंत्रांनी अभिषिक्त राजा राज्य करावा आणि संपूर्ण जगाला दाखवले जाऊ शकेल की, आपल्या परंपरेने देखील कल्याण होऊ शकते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच शंकराचार्य यांनी नेपाळमध्ये जोपर्यंत राजेशाही होती, तोपर्यंत कोणतीही गडबड नव्हती असा दावा केला आहे. यानंतर त्यांनी चीनने नेपाळमध्ये (Nepal) प्रचंड यांना उभे करुन लोकशाहीचं वातावरण तयार केलं, मात्र आता तेथील जनता आता असंतुष्ट आहे.या नाराज जनतेकडून पुन्हा एकदा राजेशाहीची मागणी होऊ लागली आहे.
भारतातही लोकशाहीऐवजी राजेशाही लागू करण्याची गरज असल्याचं खळबळजनक विधान ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलं आहे. ते म्हणाले, भारतात हिंदू बहुसंख्य असूनही दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनला आहे. अल्पसंख्याकांसाठी 300 योजना सुरु आहे. आणि त्यांची प्रत्येक मागणी मान्य होत आहे. तर 100 कोटी सनातनींचे ऐकले जात नसल्याची खरमरीत टीकाही त्यांनी सरकारवर केली.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी बिहार निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि गोहत्येला दंडनीय अपराध ठरवला जाण्यासाठी प्रत्येक विधानसभा जागेवर अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणाही शंकराचार्य स्वामींनी केली आहे.
नेपाळमध्ये तरुणाईचं रौद्ररुप आणि पेटलेला हिंसाचारामुळे तेथील ओली सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. वाढता भ्रष्टाचार आणि सरकारने जवळपास सर्वच सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे तरुणाईच्या संतापाचा उद्रेक झाला. यामुळे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी मंगळवारी (ता.9) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याआधी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही राजीनामा दिला होता.
पंतप्रधान ओली यांच्या पलायनानंतर तेथील काही मंत्र्यांनीही राजीनामा देत देश सोडण्याच्या तयारीत आहे. आंदोलकांची मजल थेट मंत्र्यांची निवासस्थाने पेटवून देण्यापर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर Gen झींनी संसदेलाही आग लावली. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या तिथे अराजकता निर्माण झाली असून सत्तेचा कारभार लष्करानं हातात घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.