Maharashtra's No.1 Marathi News Site : डिजिटल क्षेत्रात 'सकाळ'चेच वर्चस्व; विश्वासार्हतेच्या जोरावर eSakal.com बनली महाराष्ट्राची नंबर १ वेबसाइट

No.1 Marathi News Portal : Comscore Report 2026 नुसार eSakal ने भारतातील सर्वाधिक वाचली जाणारी आणि आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट म्हणून स्थान मिळवले आहे. विश्वासार्ह पत्रकारिता आणि डिजिटल क्षेत्रातील वर्चस्वामुळे eSakal पुन्हा एकदा अव्वल ठरली.
No.1 Marathi News Website
No.1 Marathi News WebsiteSarkarnama
Published on
Updated on

No.1 Marathi News Website : डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सकाळ मीडिया समूहाच्या ई-सकाळने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 2026 च्या Comscore अहवालानुसार eSakal.com ने मराठी वृत्त संकेतस्थळांच्या स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखत सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. मराठी डिजिटल माध्यमांमध्ये सर्वाधिक वाचकांपर्यंत पोहोचणारे व्यासपीठ म्हणून ई-सकाळची नोंद झाली असून, सुमारे 6.2 कोटी युजर्सपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वपूर्ण टप्पाही या प्लॅटफॉर्मने गाठला आहे.

बदलत्या काळानुसार वाचकांच्या अपेक्षा आणि डिजिटल माध्यमातील प्रवाह ओळखत ई-सकाळने सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा केल्या आहेत. जलद गतीने बातम्या पोहोचविणे, माहितीची अचूकता राखणे आणि विश्वासार्ह पत्रकारितेची परंपरा कायम ठेवणे या वैशिष्ट्यांमुळे वाचकांचा मोठा वर्ग ई-सकाळशी जोडला गेला आहे. याच विश्वासाच्या बळावर ई-सकाळने मराठी डिजिटल विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

No.1 Marathi News Website
नाशिकच्या 1 हजार 128 अधिकाऱ्यांचा काळजाला भिडणारा निर्णय, सर्वत्र होतय कौतुक

सकाळ समूहाने प्रिंट माध्यमात निर्माण केलेली विश्वासार्हता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही यशस्वीपणे जपली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आकर्षक सादरीकरण आणि वाचकांच्या गरजांनुसार तयार होणारा दर्जेदार कंटेंट यामुळे ई-सकाळची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच Comscore च्या ताज्या क्रमवारीत ई-सकाळने प्रतिस्पर्धी मराठी वृत्त संकेतस्थळांना मागे टाकत अग्रस्थान कायम ठेवले आहे.

राजकीय घडामोडी, क्रीडा विश्व, मनोरंजन क्षेत्र, तंत्रज्ञान, शेती, अध्यात्म, करिअर मार्गदर्शन तसेच लाइफस्टाइलसारख्या विविध विषयांवरील बातम्या आणि विशेष लेख ई-सकाळवर उपलब्ध असतात. राज्यातील ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंतच्या स्थानिक घडामोडींना दिले जाणारे प्राधान्य हे देखील या यशामागील महत्त्वाचे कारण मानले जाते.

डिजिटल माध्यमांमध्ये व्हिडिओ स्टोरीज, हायपरलोकल रिपोर्टिंग, विशेष विश्लेषण आणि मोबाईलसाठी सुलभ अनुभव यांसारखे नवे प्रयोग ई-सकाळने प्रभावीपणे राबवले आहेत. त्यामुळे तरुण वाचकांचाही या प्लॅटफॉर्मकडे मोठ्या प्रमाणात ओढा वाढला आहे.

No.1 Marathi News Website
Bhagwant Mann Video : मुख्यमंत्र्यांच्या हातात दारूचा ग्लास अन्..! अकाल तख्तने भगवंत मान यांना धरले दोषी, निवडणुकीच्या तोंडावर धक्का

Comscore अहवालातील हे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून मराठी वाचकांनी दाखवलेल्या विश्वासाचे आणि सकाळ समूहाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे प्रतीक मानले जात आहे. मराठी डिजिटल पत्रकारितेत नेतृत्व कायम राखत ई-सकाळने पुन्हा एकदा आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com