Uddhav Thackeray On Modi : ... म्हणूनच पंतप्रधान महाराष्ट्रात येत नाहीत का? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल!

Uddhav Thackeray question to PM News : राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पिचला आहे. पुरामुळे शेतात उभे असलेले पीक वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.
Narendra Modi Uddhav Thackeray
Narendra Modi Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पिचला आहे. पुरामुळे शेतात उभे असलेले पीक वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र, राज्य सरकारकडून दिली जात असलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगत महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना मदत करण्याची गरज आहे. मात्र, राज्यात सध्या निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत नाहीत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला .

ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा पाहणी केली. त्यानंतर शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 75 लाख महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये टाकले आहेत. बिहारला मदत करत आहेत म्हणून पोटदुखी होत नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाल भरभरुन मतदान केले, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना मदत केली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याना मदत करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Narendra Modi Uddhav Thackeray
Harshwardhan Sapkal warning to BJP : 'सरकारला शेतकऱ्यांशी देणघेण नाही, राज्यात बंडाळीची स्थिती'; हर्षवर्धन सपकाळांनी दिला 'अलर्ट'

महाराष्ट्रातील शेत जमीन पुन्हा पीक घेण्यायोग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागणार आहेत. आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे. आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च 5 लाख आहे. शेत जमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Narendra Modi Uddhav Thackeray
Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्याचं मोठं विधान; म्हणाला, ‘देवाभाऊ भावनिक...'

2017 च्या कर्जमाफीची अजून प्रतीक्षा आहे. माझं महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मी कालबद्ध पद्धतीने कर्जमाफी केली. संकट आल्यावर पंचाग काढून बसलो नाही. मला यात राजकारण आणायचं नाही. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करणे मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Narendra Modi Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'राजकारण वाटत असेल तर वाटू द्या आम्ही...'

शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा. पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपये कालबद्ध मदत तिथल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली. याला म्हणतात सरकार. पंतप्रधानांनी पंजाबला 1600 कोटी आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला 50 हजार रुपये मदत द्या. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. समोर दिसतय तर चर्चा कसली करता. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर दिसतय तर प्रस्ताव कसला पाठवायचा?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

Narendra Modi Uddhav Thackeray
Shivsena Politics : 'लाजेखातर का होईना...' उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचे 'ते' फोटो शेअर करत शिंदेंच्या महिला नेत्याचे ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com