
Mumbai News : राज्यात 2014 साली पहिल्यांदाच भाजपचे सरकार आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता. त्यांनी ही जबाबदारी पाच वर्ष सक्षमपणे सांभाळली. त्या ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी घेतलेले काही लोकोपयोगी निर्णय अजूनही जनतेच्या स्मरणात आहेत. त्यातच बीड येथील एका कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांना त्याकाळी घेतलेला एक निर्णय लक्षात आला. त्या सभेत त्यांनी तो संपूर्ण किस्साच सांगितला.
शिक्षकांची पिळवणूक होत होती. त्यावेळी 15 वर्षांपासून त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. अनेक वर्षांपासून काही शिक्षक एकाच ठिकाणी होते. पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात होते. त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. बदल्यांसाठी त्यांनी पैसा दिल्याशिवाय त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. तो प्रकार माझ्या लक्षात आला. त्यानंतर मी ऑनलाईन बदलीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात विरोध झाला मात्र त्यानंतर ही पारदर्शक बदली प्रक्रिया आजही सुरु असल्याचे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी सांगितले.
ऊस तोड कामगारांना सहकार्य मी करणार आहे. प्रत्येक ऊस तोड कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री असली तर माझे लक्ष माझ्या मायभूमीकडे बारीक लक्ष असणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री असली तरी माझ्या जन्मभूमीकडे माझे लक्ष राहणार आहे. बीडमध्ये अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री आहेत. मी मंत्री आहे. दादांना शिस्तीत काम करून दाखवावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले
मी मंत्री आमदार, खासदार, नसताना देखील बीड जिल्ह्यातील जनतेने प्रेम दिले. मी गडावर अनेक वर्षांपासून येत आहे. बाबांबरोबर या गडावर येत होते. तेव्हापासून अपवाद वगळता मी या गडावर आले, असेही पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले
गडावर कोणालाही बोलवा. माझी हरकत नाही. गडाच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे. जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत मी काम करणार आहे. लोकांनी नाही म्हटल्यावर मी घरच्या गादीवर बसले. आपले तत्व आपल्यासाठी आदर्श असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.