
New Dehali : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमधील मतभेद चव्हाटयावर आले आहेत. एवढेच नव्हे तर या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सहकारी असलेल्या आम आदमी पक्ष व काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढली नाही. दोन्ही पक्षाने दिल्लीतील निवडणूक स्वतंत्रपणे लढली. त्यामुळे या दोन पक्षात पडलेल्या फुटीचा फटका दोन्ही पक्षाला सहन करावा लागला. त्यामुळे आम आदमी पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले तर काँग्रेसला या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच येत्या काळात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत तरी इंडिया आघाडीत एकत्र दिसेल का ? अशा चिंता सतावत आहे.
राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी आम आदमी पार्टीला सपशेल पराभव करीत भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकले. परंतु, तिसऱ्यांदा काँग्रेसच्या (Congress) जागात कोणताही बदल झालेला नाही. एकीकडे काही राज्यात प्रादेशिक पक्ष वरचढ ठरत असताना काँग्रेसला मिळत असलेले अपयश आत्मचिंतन करायला लावणारे आहे.
दिल्लीत झालेल्या आपच्या पराभवाचा देशातील इतर राज्यातील राजकारणावर परिणाम होणार आहे. याचा परिणाम आगामी काळात विधानसभा निवडणुका होत असलेल्या राज्यावर जाणवणार आहे. येत्या काळात या निकालाचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून निर्माण झालेल्या एका पक्षाचा ज्याठिकाणी उदय झाला ती दिल्ली त्यांच्या हातातून निसटली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय अस्तित्वासाठी आम आदमी पक्षाला झगडावे लागणार आहे.
लोकसभ निवडणुकीवेळी इंडिया आघाडीने दाखवलेल्या एकजुटीचा परिणाम जाणवला. त्याचमुळे काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात व उत्तरप्रदेशात भाजपला (Bjp) अपयश आले होते. त्यानंतर पार पडलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने महायुतीलासोबत घेत विधानसभा निवडणुकीत 'न भुतो न भविष्यती' यश मिळवले होते. लाडकी बहीण योजनेचा भाजप आणि महायुतीला फायदा झाला होता.
दरम्यान, आपच्या पराजयाचा देशाच्या राजकारणावर परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. यामुळे येत्या काळात भाजपच्या विरोधातील पक्षांना विजयासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते. जरी आप राजकीय दृष्ट्या तळागाळापर्यंत पोहोचला नसला तर भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनामुळे अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आप पक्ष काही राज्यात पोहचवला होता.
डिसेंबरमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय दृष्ट्या ही दोन्ही राज्य महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे उत्तर भारतात या राज्याच्या राजकारणाचा परिणाम जाणवतो. त्यामुळे जर भाजप विजयी झाला तर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपसाठी सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव हे इंडिया आघाडीबाबत सकारात्मक दिसत आहेत. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही या निवडणुकीत बॅकफूटवर येत आघाडी करण्याची गरज आहे. अन्यथा महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीप्रमाणे इंडिया आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची रणनीती काय असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यासोबतच पुढील वर्षी उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याठिकाणी प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला असून त्याचा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी इंडिया आघाडीला यश मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकत्र असल्याचा फायदा महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. त्याठिकाणी असलेले मोदींचे व भाजपचे आव्हान मोडून काढता आले होते.
नुकत्याच दिल्लीत काँग्रेस व आम आदमी पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे आपची सत्ता गेली तर काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे आता येत्या काळात इंडिया आघाडी एकसंध ठेवायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.