NCP News : शरद पवार गटाची डोकेदुखी कायम राहणार की दिलासा मिळणार? 'पिपाणी' बाबत निवडणूक आयोग मोठा निर्णय देणार

NCP Sharadchandra Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या 'पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.
NCP Sharadchandra Pawar Party
NCP Sharadchandra Pawar PartySarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या 'पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाशी 'पिपाणी'चे साम्य असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

शिवाय ही दोन्ही चिन्हे सामान्यतः 'तुतारी' म्हणून ओळखली जातात असा उल्लेख पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सोमवारी (ता.8 जुलै) निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) गटाने 'पिपाणी' या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना 'पिपाणी' चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती.

NCP Sharadchandra Pawar Party
Sharad Pawar : लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी शरद पवार साताऱ्यात ॲक्टिव्ह; कार्यकर्त्यांना म्हणाले...

मात्र, पिपाणी आणि तुतारीतील साधर्म्यामुळे ती जागा आम्ही हरलो असं असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं म्हणणं आहे. तर पिपाणीमुळे आमचं नुकसान होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये यासाठी या चिन्हाबाबात आयोगाने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. शिवाय याआधीही या चिन्हाप्रकरणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं.

तर राष्ट्रवादीच्या (NCP) चिन्हाबाबतचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित असून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने यावर तत्काळ निर्णय द्यावा अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. अशातच आता आज सोमवारी (ता.8 जुलै) रोजी या दोन्हीं अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

NCP Sharadchandra Pawar Party
Video Mumbai Heavy Rain: मुंबईतील पावसाचा फटका आमदारांना; मदत, पुनवर्सन मंत्री अनिल पाटील अडकले ट्रेनमध्ये!

त्यामुळे आयोग पिपाणी चिन्हाबाबात नेमका काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29 B नुसार राजकीय पक्ष म्हणून खाजगी व्यक्ती किंवा एखाद्या कंपनी, संस्थेकडून देणगी घेण्यास परवानगी द्यावी, अशी याचिकादेखील पक्षाने दाखल केली आहे. यावरही आज सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com