Sikandar Sheikh Arrested : अटकेत असलेल्या सिकंदर शेखसाठी रोहित पवार मैदानात! सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलणी...

Rohit Pawar Supriya Sule : शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या पैलवान सिकंदर शेख याला अडकवले जात असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या संदर्भात पंजाब सरकारशी संपर्क साधला जाण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Sikandar shaikh  Rohit Pawar
Sikandar shaikh Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : 2024 मध्ये मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावणार पैलवान सिंकदर शेख याला अवैध शस्त्र तस्कीर प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानमधील गुर्जर टोळीशी त्याचा संपर्क असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. दरम्यान, सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला अडकवले जात असल्याचा आरोप केला. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'पै. सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो.'

'महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात खासदार सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल', असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Sikandar shaikh  Rohit Pawar
Shivsena Politics : 'एकनाथ शिंदेंच महायुतीचा वाघ आणि म्हणूनच...'

भाजपची भूमिका काय?

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सिंकदर शेखच्या अटकेवर बोलताना म्हणाले, 'या प्रकरणावर आम्ही भाष्य करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय असेल याची दखल पोलिस घेतील. त्यामध्ये सत्य असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत. योग्य ती कारवाई होईल. जर कोणी गोवण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे एका खेळाडूला गोवू नये, अशा पद्धतीची आमची स्पष्ट भूमिका आहे.'

Sikandar shaikh  Rohit Pawar
Sangram Jagtap Hindutva statement : अजितदादांचा शिलेदार पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार भरण्याच्या तयारीत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com