Yashomati Thakur On Sambhaji Bhide : 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी गोळा केलेल्या निधीचं काय केलं? संभाजी भिडेंना यशोमती ठाकूर यांचा सवाल

Yashomati Thakur Criticized Sambhaji Bhide : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी कुणी विरोध केला हे अख्खा महाराष्ट्र जाणून आहे, असा टोला यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडेंना लगावला.
Yashomati Thakur publicly questions Sambhaji Bhide about the use of funds collected for the grand 32-ton gold throne project.
Yashomati Thakur publicly questions Sambhaji Bhide about the use of funds collected for the grand 32-ton gold throne project.sarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur News : संभाजी भिडे यांनी सहा जूनला होणार शिवराजाभिषेक साजरा करू नका, असे आवाहन केले. सहा जूनचा राज्याभिषेक हद्दपार करण्यात यावा आणि केवळ तिधी प्रमाणे राज्याभिषेक साजरा केला जावा, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी कुणी विरोध केला हे अख्खा महाराष्ट्र जाणून आहे. आज त्याच मंडळी मधील एक मनोहर भिडे सारखी मंडळी राज्याभिषेक पद्धत बंद करण्याची मागणी करतायत. सर्वसमावेशक धोरणांची अंमलबजावणी करणारे छत्रपती शिवराय हे इथल्या तमाम रयतेचे, शेतकरी, शेतमजुरांचे राजे होते. मनोहर भिडे सारख्यांचं हेच खरं दुखणं आहे.', असे यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

'भिडेने 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी जो निधी राज्यातील सर्वसामान्य जनतेकडून गोळा केला त्याचं काय केलं ? असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तसेच आमच्या रयतेच्या राजाची बदनामी करण्याचा घाट पुन्हा घालत असाल तर गाठ महाराष्ट्रातील शिवप्रेमी सोबत आहे, हे भिडे यांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Yashomati Thakur publicly questions Sambhaji Bhide about the use of funds collected for the grand 32-ton gold throne project.
Vaishnavi Hagawane : उद्धव ठाकरेंनी वैष्णवी हगवणेच्या कुटुंबीयांना केला फोन, शिवसेना परिवार सोबत असल्याचा दिला विश्वास

संभाजी भिडेंचा निषेध

सहा जूनचा राज्याभिषेक दिन साजरा करू नका या भिडेंच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनी निषेध केला आहे. तसेच भ्रम निर्माण करून बहुजन महापुरुषांची बदनामी करायची, त्यांचं महत्त्व कमी करायचं हा ह्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यातूनच अशाप्रकारची विधानं ही मंडळी करत असतात, असा टोला देखील लगावला आहे.

Yashomati Thakur publicly questions Sambhaji Bhide about the use of funds collected for the grand 32-ton gold throne project.
Rajendra Hagwane : आलिशान गाड्यांतून सफर आणि यथेच्छ मटण पार्टी! फरार असताना हगवणे पिता-पुत्राने सात दिवस ऐशोआरामात घालवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com