

तुम्हाला माहितीये का आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी पिवळे रेशन कार्ड दिले जाते. या रेशन कार्डच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त दरात अन्नधान्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे पिवळे रेशन कार्ड कोणाला मिळते, त्यासाठी कोणत्या अटी आहेत आणि अर्ज कसा करायचा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पिवळे रेशन कार्ड मिळण्यासाठी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेखाली (BPL) असणे अपेक्षित आहे. याशिवाय कुटुंबाकडे टॅक्सी वगळता चारचाकी वाहन नसावे. जिरायत जमीन 2 हेक्टरपेक्षा आणि बागायत जमीन 1 हेक्टरपेक्षा जास्त नसावी.
कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट किंवा चार्टर्ड अकाउंटंट नसावी. तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकरदाता नसणे हीदेखील महत्त्वाची अट आहे. या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना पिवळ्या रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो.
अर्जासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल, पाणी बिल किंवा भाडेकरार, तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेला 15,000 पर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला आणि कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. नवीन नाव समाविष्ट करायचे असल्यास किंवा कुटुंब विभक्त झाले असल्यास जुन्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचा दाखलाही लागू शकतो.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपले सरकार महाऑनलाइन पोर्टलवर जावे. नवीन वापरकर्त्यांनी 'New User? Register Here' या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. लॉगिन केल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभाग (Food & Civil Supplies Department) निवडून 'New Ration Card' अर्जाचा पर्याय निवडावा.
यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती, आधार क्रमांक आणि उत्पन्नाची माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर निर्धारित शुल्क ऑनलाइन भरून अर्ज सबमिट करावा. अर्जाची पोचपावती जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन प्रक्रिया करता येत नसल्यास जवळच्या सेतू केंद्रातूनही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अर्ज करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाची पात्रता आणि सध्याचे सरकारी नियम अधिकृत पोर्टल किंवा संबंधित तहसील कार्यालयातून तपासणे आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.