MNS Politics : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बोलताना मनसे नेत्याची जीभ घसरली; म्हणाले, 'कुत्रा...'

Yoge Chile Criticized gunaratna sadavarte : राज ठाकरेंना भाषेचे राजकारण करण्याचा विशेष अधिकार नाही. ते हिंदुस्थानातील सामान्य नागरिक आहेत. याचा अर्थ त्यांच्या टोळक्यांना बेकायद्याची मंडळींना बँकेत जाऊन धुडगूस घालावा, असे नाही, गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
Raj Thackeray gunaratna sadavarte
Raj Thackeray gunaratna sadavartesarkarnama
Published on
Updated on

Yoge Chile News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुडपाडव्याच्या आपल्या सभेत बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, असे म्हटले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये जाऊन मराठीच्या वापराविषयी अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात वाद देखील झाले. यावरून अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना इशारा दिला.

राज ठाकरेंना भाषेचे राजकारण करण्याचा विशेष अधिकार नाही. ते हिंदुस्थानातील सामान्य नागरिक आहेत. याचा अर्थ त्यांच्या टोळक्यांना बेकायद्याची मंडळींना बँकेत जाऊन धुडगूस घालावा, असे नाही. मी त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त यांना निवेदन आणि पुरावे देणार आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Raj Thackeray gunaratna sadavarte
Waqf Amendment Bill : 'वक्फ' बिलाविरोधात ठाकरे गट आक्रमक, पण मतदानावेळी शरद पवारांसह राष्ट्रवादीचे 'ते' 2 खासदार गैरहजर, चर्चांना उधाण

गुणरत्न सदावर्ते यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांची जिभ घसरली. ते म्हणाले, 'सदावर्ते नावाचा कुत्रा कोणी पाळला आहे हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे.पाळलेल्या कुत्र्याला छू म्हटले की तो भुंकतो. त्याच्या भुंकण्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष देत नाही.'

'ज्या दिवशी सदावर्तेला गप्प करण्याचा विषयी येईल त्या दिवशी आम्ही त्याला गप्प करू', असा इशारा देखील चिले यांनी सदावर्तेंना दिला.

चिले यांनी सुरज चव्हाण यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, सुरज चव्हाणांचा पक्ष संपत होता म्हणून ते भाजपच्या मांडीवर बसले. आम्ही मराठीबद्दल बोलतोय म्हणून त्यांना वैषम्य वाटायला लागले आहे. आम्ही पूर्वी देखील मराठी बद्दल बोलत होता आजही मराठी बद्दल बोलतोय आणि उद्याही मराठी बद्दल बोलणार.

राज ठाकरे न्यायदेवता नाहीत

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, कोणीही भाषेच्या विरोधात नाही. भाषेच्या नावाखाली राजकीय भडेजाव करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन धुडगूस घालता. महिलांना माफी मागायला लावता. राज ठाकरे तुम्ही न्यायदेवता आहे.

Raj Thackeray gunaratna sadavarte
Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या नागपुरातच गोळीबाराचा थरार! दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने भरबाजारात तरूणाला संपवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com