Prashant Jagatap : शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसचा हात धरणाऱ्या प्रशांत जगतापांना 'भाजप'चा कठीण पेपर

PMC Election Ward 18 Election : अभिजीत शिवरकर हे माजी काँग्रेस मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक आहेत ते 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
Pune Corporation-Prashant Jagtap
Pune Corporation-Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 Jan : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ वानवडी-साळुंखे विहार भागत काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि भाजपचे अभिजीत शिवरकर यांच्यात थेट लढत होत आहे. ही लढत पुण्याच्या राजकारणात विशेष लक्षवेधी ठरली आहे. कारण दोन्ही नेते एकेकाळचे जवळचे मित्र होते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळवलं आहे.

प्रशांत जगताप पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसरमधून उमेदवार होते, मात्र ते काही मतांनी पराभूत झाले. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये अजित पवार आणि शरद पवार गटांच्या संभाव्य युतीला विरोध करून त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तर अभिजीत शिवरकर हे माजी काँग्रेस मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक आहेत ते 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना प्रशांत जगताप यांच्या विरोधात वानवडी भागातून उमेदवारी दिली आहे. एकूणच भाजपने प्रशांत जगताप यांच्यासमोर अवघड पेपर दिल्याचं बोलत आहेत.

Pune Corporation-Prashant Jagtap
Nashik municipal election : महापालिकेतील एबी फॉर्मच्या गोंधळाबाबत गिरीश महाजनांचे कानावर हात; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांशी बोलू...'

प्रभागातील समीकरण

हा प्रभाग मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र भाजपची वाढती ताकद आणि शिवरकरांचा स्थानिक प्रभाव यामुळे चुरस वाढली आहे. मात्र प्रभागातील मुस्लिम मतदार एक टर्निंग फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे.एकूण या प्रभागात मुख्यतः भाजप विरुद्ध एकत्रित राष्ट्रवादी आणि काँग्रेस-उद्धव सेना-मनसे अशी चौरंगी लढत आहे.

Pune Corporation-Prashant Jagtap
Rahul Narvekar controversy : राहुल नार्वेकरांची अडचण वाढली, उद्धव ठाकरेंनी थेट मुद्याला हात घातला; विधानसभा अध्यक्षपद जाणार?

जगतापांची ताकद हि स्थानिक पातळीवर मजबूत संघटना, मागील कामगिरी आणि पुरोगामी विचारसरणीच्या मतदारांचा पाठिंबा. काँग्रेसच्या महाविकास आघाडीतील भूमिकेमुळे ठाकरे सेना आणि इतरांचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. तर शिवरकरांच्या ताकदीचा विचार केल्यास भाजपच्या स्थानिक यंत्रणेचा फायदा, विकासकामांचा प्रचार आणि वडिलांच्या राजकीय वारशाचा प्रभाव. भाजपची पुण्यातील वाढती लोकप्रियता याचा लाभ मिळू शकतो.

ही लढत प्रतिष्ठेची

प्रशांत जगताप यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठेची आहे. कारण पूर्वगामी विचारांचा दाखला देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याच्या या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली. काहींनी ही राजकीय आत्महत्या असल्याचं सांगितलं तर काहींनी प्रशांत जगताप यांनी विचारांना महत्त्व दिल्याचे म्हंटले. मात्र याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना नेमकं काय वाटतं हे निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. त्यामुळे एकूणच प्रशांत जगताप यांच्या राजकीय करिअरला कालाटणी देणारी ही निवडणूक ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com