Pune News : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनाला दरम्यान बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर गंभीर टीका केली आहे. पक्षात कोणतही पद हवं असल्यास त्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागतात, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. या आरोपाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
सुषमा अंधारे म्हणल्या, नीलम गोऱ्हे या पक्षात असताना अनेक आर्थिक व्यवहार , देवाण-घेवाण चालायच्या असे आरोप त्यांनी केले आहेत. तसंच पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज कार द्याव्या लागत असल्याचे त्या म्हटल्या आहेत. मात्र, आम्हाला पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाले आहे. पण त्यापूर्वी नीलम गोऱ्हे या सातत्याने 'मातोश्री'वर 18 महिने 13 त्रिकाळ पडीक असायच्या.
पक्षात कोणाला घ्यायचं कोणाला नाही. घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा ? कुणाला द्यायचा नाही ? एवढंच नव्हे तर मातोश्रीच्या गेटच्या आत मध्ये कोणाला घ्यायचं ? आणि कोणाला घ्यायचं नाही. याबाबत बॅरिकेट लावण्याचे काम या नीलम गोर्हे याच करत होत्या. कुणाची नियुक्ती करायची, सभा संमेलनांना कुठे वेळ द्यायची हे ठरवणाऱ्या नीलम गोऱ्हे होत्या, असे देखील अंधारे यांनी म्हटले.
त्यांच्या (नीलम गोऱ्हे) म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या नेमणुका निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोऱ्हे होत्या म्हणजे हा सगळा पैसा निलम गोऱ्हेंकडे येत असणार? मग त्यांनी काय केलं असेल त्यांनी एवढ्या पैशाचं? परदेशात एखादं बँक खाते असेलच की काय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, पुण्यातले शिवसैनिक सांगतात कशा पद्धतीने महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये नीलम गोऱ्हे यांचे भाजपची आर्थिक हितसंबंध जुळायचे आणि इथली शिवसेना त्यांनी कशी 'बापटसेना' करून ठेवली. पुण्यातले बिल्डर व्यापारी यांच्याकडे कलेक्शनला जाणारी माणसं यावर पुण्यातले शिवसैनिक अत्यंत चवीने चर्चा करतात.
नीलम गोऱ्हे यांचे नाव घेतलं की मी फार प्रयत्न करते त्यांची एखादी गाजलेली सभा आठवण्याचा. ज्या सभेत त्यांनी अत्यंत घणाघाती भाषण केलं असेल. किंवा एखाद्या प्रचंड मोठ्या आंदोलन यांनी लाठ्या काठ्या खाल्या असतील.एखादा मोठा भ्रष्टाचार जो त्यांनी प्राणपणाने लढून बाहेर काढला असेल. तर मला असं काहीच आठवत नाही, असे टोला देखील सुषमा अंधारे यांनी गोऱ्हे यांना लगावला आहे.
नीलम गोऱ्हे हे नाव उच्चारलं की मला आठवतात त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या, हिरे, मोती, माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस. त्याच्यावर तसेच कानातले डूल, साडीला मॅचिंग अशी महागडी ऐटदार पर्स, तीन-चार मोबाईल... दोन-तीन पीए. कुणाच्या हातात मोबाईल, कोणाच्या हातात डायरी तर कुणाच्या हातात मॅडमसाठी दोन-चार हातरुमालाच्या घड्या. पण एवढी आर्थिक सुबत्ता आली कशी? नीलम गोऱ्हे तुम्ही अजून कमवा आणि मखलाशा करून अजून पद मिळवा.पण ज्या पक्षाने तुमचं कर्तृत्व नसताना तुम्हाला मोठं केलंय त्यांच्यावर बोलताना जरा तारतम्य बाळगा.इतकं खोटं लोकांना पचत नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.