"Neelam Gorhe यांनी 9 पद भोगली, 18 मर्सिडीजचा हिशोब द्या" : ठाकरेंच्या नेत्याचे ओपन चॅलेंज

Neelam Gorhe Mercedes claim : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून चहुबाजूंनी टीका होत आहे.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Neelam Gorhe News : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आतापर्यंत 9 पदे भोगली आहेत. त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरे यांना 18 मर्सिडीज गाड्या दिल्या का? दिल्या असतील तर त्याचा हिशोब द्यावा असे ओपन चॅलेंज शिवसेना (उबाठा) पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिले आहे. 'एक्स'वर ट्विट करून त्यांनी नीलम गोऱ्हे यांनी आतापर्यंत कोणकोणती पदे भोगली याची यादीच दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा गंभीर आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. नवी दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. त्यानंतर त्यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून चहुबाजूंनी टीका होत आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनीही "हे सगळे गए गुजरे लोकं" असं म्हणत गोऱ्हेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Neelam Gorhe
Neelam Gorhe : "शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं..." नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

नीलम गोऱ्हे यांनी आतापर्यंत कोणती कोणती पदे उपभोगली?

2002 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (पहिला कार्यकाळ)

2008 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (दुसरा कार्यकाळ)

2010 : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते

2011 पासून: शिवसेना उपनेते

2014 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (तिसरा कार्यकाळ)

2015 : विशेष हक्क समिती (विशेष हक्क समिती) अध्यक्ष, महाराष्ट्र विधान मंडळ

2019 : महाराष्ट्र विधान परिषदच्या उपसभापती म्हणून निवड (पहिला कार्यकाळ)

2020 : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (चौथा कार्यकाळ)

2020 : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निवड (दुसरा कार्यकाळ)

ही यादी शेअर करत अखिल चित्रे म्हणाले, नीलम ताई तुम्ही म्हणता एका पदासाठी शिवसेनेत दोन मर्सिडीज द्यावी लागतात. मग वरील नऊ पदांसाठी तुम्ही दिलेल्या 18 मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. 22 फेब्रुवारी 1998 रोजी म्हणजे बरोबर 27 वर्षांपूर्वी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या (Uddhav Thackeray) कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो 'हा शुद्ध कृतघ्नपणा आहे'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com