Sunetra Pawar Banner : '' बारामतीच्या भावी खासदार सुनेत्रा पवार !"; बॅनर झळकले थेट मंत्रालय परिसरात !

Baramati MP : राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये चर्चांना उधाण ; या अगोदर बारामतीमध्येही झळकलं होतं बॅनर
Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना भावी खासदार असं संबोधून मुंबईत मोठे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे मंत्रालय परिसरातही 'बारामती लोकसभेच्या भावी खासदार सुनेत्रा पवार'(Sunetra Pawar) असा मजकूर असलेलं भलं मोठं बॅनर लावण्यात आलं आहे.

मागील काही दिवासंपासन पवार विरुद्ध पवार अशी बारामती लोकसभा निवडणूक होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. आता याच पार्श्वभूमीवर हे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunetra Pawar
Amol Mitkari : ''2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री असतील अन्...'' ; बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर अमोल मिटकरींचा दावा !

मुंबईत मंत्रालय परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर झळकलेल्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही फोटो आहे. तर बॅनरच्या वर मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा उल्लेख असून, त्याखाली अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत. माजी नगसेविका प्रतीक्षा राजू घुगे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलं असून, त्यांचाही यावर फोटो आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बारामतीमध्येही अशाच प्रकारचे बॅनर झळकले होते. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, भविष्यात काहीही होऊ शकतं. असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे चर्चांना अधिकच जोर चढला होता.

Sunetra Pawar
Bjp News : भाजपचं ठरलं ! राज्यातून लोकसभेसाठी 'यांना' उतरविणार रिंगणात

आता या उघड बॅनरबाजीमुळे भविष्यात सुनेत्रा पवार खरंच बारमती लोकसभा निवडणूक लढवणार का? आणि बारामतीच्या विद्यमाना खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना आव्हान देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com