दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर संजय राऊतांबाबत मोठी अपडेट!

Sanjay Raut : आज राऊतांच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी पार पडली.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : एकीकडे दसरा मेळाव्याची लगबग सुरू असताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बाबतीत मोठी अपडेट आली आहे. राऊतांच्या कोठडीत वाढ झाली असून त्यांच्या जामीन अर्जावर आता थेट १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. आज त्यांच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी पार पडली. आता सात दिवसांनी थेट १० ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार असल्यामुळे त्यांचा दसरा मेळावा तुरूंगातच होणार आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. २७ ऑक्टोबरला मागची सुनावणी झाली होती. १० ऑक्टोबरला पुढील तारीख कोर्टाने दिली आहे. संजय राऊतांनी त्याआधी आपल्या जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. किमान दसऱ्या मेळाव्यापर्यंत राऊतांना जामीन मिळेल, अशी आशा शिवसैनिकांमध्ये होती. परंतु त्यांनी जामीन मिळाले नाही.

Sanjay Raut
उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण : शहाजीबापूंची जहरी टीका!

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं.

म्हाडाने भाडेकरूंसाठी घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

Sanjay Raut
PFI News: काय आहे ‘पीएफआय’चे देशविघातक ‘मॉडेल २०४७’?

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com