वाद वाढला! वनगा शिवसेनेत आले पण आमचे झालेच नाहीत, त्यांना बघून घेऊ...

Eknath Shinde| Shivsena : विरारमध्ये एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला
Virar Shivsena Supporter
Virar Shivsena SupporterSarkarnama
Published on
Updated on

विरार : शिवसेनेत सुरु असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर कालपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक पुढे येत असून शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा निषेध करण्यात येत आहे.

काल (ता.25 जून) रात्री काही शिवसैनिकांनी विरारमध्ये शिंदेंचा पुतळा जाळला. तर आज (ता. 26 जून) नालासोपारा येथे बाईक रॅली काढून ठाकरे यांना समर्थन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. पालघर जिल्ह्यातील एकमेव असलेले शिवसेनेचे आमदारही शिंदेबरोबर गेल्याने, श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) पालघरमध्ये आल्यावर त्यांना बघून घेण्याचाही इशारा देण्यात आल्या.

Virar Shivsena Supporter
गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

सेनेत मोठी बंडखोरी झाल्याने शिवसेना कोणाची? यावरून ठाकरे आणि शिंदे गट समोरा समोर आले असताना, वसई, विरार, नालासोपारा येथील शिवसैनिक आता ठाकरेंच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरला आहे. पालघर जिल्ह्यावर आतापर्यंत शिंदेंचेच वर्चस्व राहिले आहे. असे असतानाही त्यांना शिवसेनेचा फक्त एकच आमदार निवडून आणता आला होता. त्याच प्रमाणे या ठिकाणी संघटना म्हणून शिवसेनेची वाढ मात्र झाली नाही. याठिकाणचे सारे निर्णय ठाण्यामध्ये बसून शिंदेच घेत असल्याने या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची वाढ मात्र खुंटली होती. वसई-विरारमध्ये महापालिका होऊन 11 वर्षे झाली तरी साधा जिल्हा प्रमुखही देण्यात आला नाही, अशी टीका ग्रामीणचे माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण यांनी केली.

ते म्हणाले, जे एकनाथ शिंदे भर सभेत भाजपवाले आमची कामे करत नसल्याने पालकमंत्री पदाचा राजीनामा देत होते. तेच आज भाजपबरोबर सरकार बनविण्याचे सांगत आहेत. यांची "समृद्धी" चांगल्या प्रकारे झाल्याने 'ईडी' मागे लागणार म्हणून भाजपला शरण जाणारे हे आता आम्हाला शिकवत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून, या गद्दारांना आता क्षमा नाही, अशी टीका त्यांनी केली. यावेळी तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, अतुल पाटील, दिलीप पिंपळे, विवेक पाटील यांच्यासह अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.

Virar Shivsena Supporter
'शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण रस्ता बदलतात'

पालघर जिल्ह्यातील एकमेव्य आमदार श्रीनिवास वनगा यांच्या बद्दलही शिवसैनिकांमध्ये मोठा रोष बघायला मिळाला. मूळचे भाजपचे असलेले वनगा शिवसेनेत आले तरी आमचे झाले नाहीत. ते जर पालघरमध्ये दिसले तर त्यांना बघून घेण्याच्या घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. यामुळे येथील वातारण संतप्त झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com