मुख्यमंत्री लवकरच अॅक्शन मोडमध्ये ; आदित्य ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठणठणीत झाले असून, आता ते कार्यक्रम, बैठकांसह प्रत्यक्ष कामकाजात उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
aaditya thackeray
aaditya thackeraysarkarnama

मुंबई : मानेवरील शस्त्रक्रियेमुळे वर्षा बंगल्यावरून कामकाज पाहणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर विरोधक टीका करीत असतात, मुख्यमंत्री प्रत्यक्ष कामकाजात उपस्थित कधी राहणार, अशी विचारणाही विरोधक करीत असतात, याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रविवारी जयंती होती. त्यांना अभिवादन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर हल्लाबोल केला. ''जनतेला भरकटवणं हेच विरोधकांचं काम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील,'' असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठणठणीत झाले असून, आता ते कार्यक्रम, बैठकांसह प्रत्यक्ष कामकाजात उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांना लवकरच 'अॅक्शन'मध्ये पाहून,'' असे आदित्य ठाकरे म्हणाले.

aaditya thackeray
विशाल फटेला पोलिसांचा दणका ; तीन बँक खाती गोठवली

रविवारी आझाद हिंद सेनेचे नेते सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर अभिवादन केले. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायर झाली. त्यानंतर मुंबईतील काही प्रकल्पांच्या उदघाटनांच्या कार्यक्रमानंतर आदित्य यांनीही मुख्यमंत्री 'अॅक्शन' दिसतील, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे हे लवकरच प्रत्यक्ष कामकाजात येणार असल्याचे स्पष्ट आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप-फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनार्दन मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत आणि लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. रूग्णसंख्या वाढत आहे,''

शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे गेल्या दिवसांपासून ते वर्षा बंगल्यावरून काम पाहात होते. त्यातही मंत्रिमंडळापासून कोरोना आढावा, शाळा-महाविद्यालयांच्या बैठकांपासून बहुतांशी कामात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सहभाग घेत होते. मात्र, मुख्यमंत्री येत नसल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सरकारल कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून ठाकरे सरकार आणि विरोधकांत अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातून काही नेत्यांमधील वाद टोकलाही गेल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी वर्षा निवासस्थानी सुभाषचंद बोस आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले. अभिवादन करतानाचा मुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. तसचे विरोधकांनाही त्यांनी आपल्या या फोटोच्या माध्यमातून एक प्रकारे उत्तरच दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com