Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar Case Update Sarkarnama

Abhishek Ghosalkar Murder Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी अमरेंद्र मिश्राला सशर्त जामीन मंजूर!

Amrendra Mishra Bail : पोलिसांच्या 'या' दाव्यात तथ्य आढळून येत नसल्याचं सत्र न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं
Published on

Abhishek Ghosalkar Murder Case and Amrendra Mishra : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करणारा मॉरिस नऱ्होना याचा बॉडिगार्ड अमरेंद्र मिश्रा याला फेब्रवारी महिन्यात गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. मात्र त्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

अमरेंद्र मिश्राचा अभिषेक घोसाळकरांच्या(Abhishek Ghosalkar) हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या पोलिसांनी केलेल्या दाव्यात, तथ्य नसल्याचे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच काही अटी आणि शर्तींसह 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देशही दिले.

Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar Shot Dead Update : यूपीच्या बंदुकीने केला अभिषेक घोसाळकर यांचा घात?

मॉरिसने ज्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या त्या बंदुकीचे लायसन्स उत्तर प्रदेशातील फुलपूर जिल्हा पोलिसांनी जारी केले होते आणि बंदूक अमरेंद्र मिश्राची असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. त्यानंतर अमरेंद्र मिश्राला (Amrendra Mishra) अटक झाली होती.

Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar Murder : घोसाळकर हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मॉरिसचा बॉडिगार्ड अमरेंद्र मिश्राला क्राइम ब्रँचकडून अटक!

पुढे या प्रकरणात मिश्रा याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती व्ही.एम पाथाडे यांनी अमरेंद्र मिश्रा मॉरिसचा अंगरक्षक होता परंतु पोलिसांनी सादर केलेले पुराव्यांवरून अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्या मृत्यूस अमरेंद्र मिश्री कारणीभूत असल्याचे दिसत नसल्याने त्याला जामीन मंजूर केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com