Mumbai News : मुंबईच्या दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नाेरोन्हाने पाच गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. (Abhishek Ghosalkar Murder Case)
या हत्या आणि आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात दोन वर्षांपूर्वीचा जुना वाद झाला होता, त्याची गोष्ट पुढे येत आहे. ही घटना रिक्षाचालक आणि घोसाळकर यांच्यातील वादाची आहे. साधरण: दोन वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर हे आपल्या चारचाकी वाहनातून बोरिवली परिसरातून जात होते. या वेळी एका रिक्षाचालकाने त्यांच्या कारला मागून धडक दिली. रिक्षाचालकाशी घोसाळकरांची बाचाबाची झाली. या वेळी तिथे आणखी रिक्षाचालक धावून आले आणि त्या सर्वांनी घोसाळकरांना मारहाण केली. घोसाळकर आणि रिक्षाचालकांचा या भांडणाचा मुद्दा मॉरिस नाेरोन्हा यांनी फेसबुक लाइव्हद्वारे सार्वजनिक करत, घोसाळकरांवर आगपाखड केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, "या फेसबुक लाइव्हमुळे घोसाळकर आणि मॉरिस यांच्यातील संघर्ष वाढत गेला. या वादानंतर घोसाळकर यांनी मॉरिस आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनरमधील वादाचा मु्द्दा उचलला. यामुळे मॉरिसला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. मॉरिसला चार महिने तुरुंगात राहावे लागले. याचाच राग मॉरिसच्या मनात होता. या गोष्टीचा कधीतरी बदला घ्यायचाच, असा विचार मॉरिसच्या मनात घोळत राहिला.
मॉरिस तुरुंगातून आल्यानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्याच्यावर नऊ कोटी रुपयांचे कर्ज झाले. अभिषेकला मी जिवंत सोडणार नाही. मला तुरुंगात टाकण्याचा त्याचा हात होता, असा तो पत्नीजवळ बोलला होता, असे सांगण्यात येते. मॉरिसच्या बायकोच्या जबाबात ही माहिती पुढे आली आहे.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.