Abhishek Ghosalkar Firing : ठाकरेंच्या शिवसैनिकांचं रौद्ररूप; मॉरिसच्या मृतदेह दफनाला मोठा विरोध

Mauris Naronha : अभिषेक घोसाळकरांवर होणार अंत्यसंस्कार
Mauris Naronha
Mauris NaronhaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Firing News : ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नरोन्हा याने गोळीबार केला. या घटनेनंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच उपचार सुरू असताना घोसाळकरांचाही मृत्यू झाला. परिणामी स्थानिक शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. दरम्यान, मॉरिसचा मृतदेह चर्च परिसरात दफन करण्यासही स्थानिकांनी विरोध केला आहे.

ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) मॉरिसने गुरुवारी रात्री पाच गोळ्या झाडल्या. तत्पूर्वी, वादानंतर मैत्रीचा बहाणा करत मॉरिसने अभिषेक यांना एका कार्यक्रमानिमित्त आपल्या कार्यालयात बोलावले होते. तेथे त्यांनी वाद संपला असून, मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे फेसबुक लाइव्हमधून जाहीर केले. तसेच आगामी काळात दोघे मिळून अनेक चांगले उपक्रम राबवू, असा संकल्पही त्यांनी केला होता. मात्र, फेसबुक लाइव्हमध्येच मॉरिसने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mauris Naronha
Abhishek Ghosalkar Shot Dead : इतना सन्नाटा क्यो हैं भाई...? अभिषेकच्या हत्येनंतर घोसाळकर कुटुंबीय पुरते हादरले

गोळीबारानंतर घोसाळकरांवर बोरिवलीतील करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान घोसाळकरांचा मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळीबार करून घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शुक्रवारी दहिसर येथील लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चच्या आवारात दफन करण्यात येणार होता. मात्र, स्थानिकांनी त्यास विरोध केला आहे. यावर आता या चर्चचे फादर जेरी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Mauris Naronha
Pune News : पुणे-बंगळुरू महामार्गावरील बोगदा अन् उड्डाणपुलाची तारीख ठरली; संसदेत गडकरींची माहिती!

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसरच्या दौलतनगर परिसरात बंद पाळण्यात आला. या परिसरात घोसाळकर कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग होता. मॉरिसने (Mauris Naronha) अभिषेक यांची हत्या केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यातूनच स्थानिकांनी मॉरिसचा मृतदेह स्थानिक चर्चमध्ये दफन करण्यास विरोध दर्शवल्याचे समजते आहे. दरम्यान, येथील फादर जेरी यांनीही त्यास परवानगी नाकारली तर मॉरिसचे पार्थिव गोराई येथील दफनभूमीत नेण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घोसाळकरांच्या बोरिवलीतील औदुंबर निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. अभिषेक यांच्या अंत्ययात्रेसाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Mauris Naronha
BJP Issues whip to MP : मोठी बातमी ! भाजपच्या सर्व खासदारांना व्हीप जारी; नेमकं कारण काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com