ACB Action : मोठी बातमी! मंत्रालयातच लाचखोरी, एसीबीने रंगेहात पकडले! थेट मंत्र्याला हटवण्याची मागणी, काँग्रेस आक्रमक

Bribery Case Rajendra Dherange Arrests : मंत्रालयातच लाच स्वीकारताना सरकारी कर्मचाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ACB officials detain government employee Rajendra Dherange during a bribery trap operation at Mantralaya in Mumbai.
ACB officials detain government employee Rajendra Dherange during a bribery trap operation at Mantralaya in Mumbai.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्रालयातच लाच स्वीकारली जात असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसीबीने एक जणाला रंगेहात पकडले. विशेष म्हणजे लाच स्वीकारणारा सरकारी कर्मचारी आहे. गुरुवारी झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली.

रंगेहात पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. तो मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात क्लार्क आहे. मंत्री नरहरळी झिरवळ यांच्या मंत्रालया ही घटना घडली. तसेच त्यांच्या खासगी सचिवाच्या नावाने पैसे मागितले सांगितले आहे. मात्र, एसीबीने याबाबत दुजोरा दिला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या दालनात राजेंद्र ढेरंगे यांना 35 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी ढरंगे यांनी लाच मागितली होती. मात्र, या विषयी संबंधिताने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून ढेरंगे यांना पकडण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

काँग्रेस आक्रमक, मंत्र्याला हटवण्याची मागणी

मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईची माहिती समोर येताच काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मंत्र्याला पदावरून हटवण्याची मागणी केली. ते म्हणाले, महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com