Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंची पंतप्रधान मोदींना 'युगपुरुषा'ची उपमा; ठाकरे गटाने सांगितलं कारण...

Uddhav Thackeray, Bal Hardas : नरेंद्र पवारांनी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आणल्याने भाजप नाराज
Shrikant Shinde, Uddhav Thackeray
Shrikant Shinde, Uddhav ThackeraySarkarnama

Kalyan Political News : पाचशे वर्षांनी युगपुरुष जन्मला, ते म्हणजे नरेंद्र मोदी अशा शब्दांत श्रीकांत शिंदेंसह इतर खासदारांनी संसदेत कौतुक केले होते. या वक्तव्याचा ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैवी आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप आणि आरएसएस त्यांच्यावर नाराज आहेत. आता त्यांची मते मिळवण्यासाठी शिंदे मोदींची स्तुती करताना दिसत आहेत, असा घणाघात हरदास यांनी केला.

खासदारांनी संसदेत पंतप्रधान मोदींना युगपुरुषाची उपमा दिल्यानंतर त्याचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटू लागले आहेत. कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी खासदार शिंदेंच्या (Shrikant Shinde) या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. बाळ हरदास यांनी संसदेत मुख्यमंत्र्यांचा मुलगाच पाचशे वर्षांत मोदींसारखे कुणी जन्मला आले नाही असे बोलतात, मग या पाचशे वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मलेच नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Shrikant Shinde, Uddhav Thackeray
Ashok Chavan : अशोकरावांचा राजीनामा अन् पृथ्वीराजबाबांनी बोलून दाखवली मनातली 'ही' खंत

गटबाजी करून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाळासाहेबांच्या विचारांवर चालत असल्याचे वारंवार सांगतात. त्या बाळासाहेबांचा जन्म या पाचशे वर्षांत झाला नाही का? असा खोचक सवालही हरदास यांनी केला. खासदार शिंदे यांच्यावर भाजप आणि आरएसएस नाराजी आहे. त्यामुळे येथे लोकसभा निवडणुकीत खासदार शिंदे यांना भाजप, आरएसएस मतदान करणार नाही. त्या भीतीतूनच ते मोदींची स्तुती करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद असल्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. यावर हरदास (Bal Hardas) म्हणाले, महायुतीत बाहेरून सर्व काही आलबेल आहे, दिसत असले तरी तसे नाही. भाजप आणि शिंदे गटात वाद असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारातून समोर आले आहे. त्यांच्यातील वादातूनच हा अनुचित प्रकार घडला, असे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी स्पष्ट केले. परिणामी त्यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे, असेही हरदास यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Shrikant Shinde, Uddhav Thackeray
Ashok Chavan Resignation : सर्व्हेतील काँग्रेसच्या यशामुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; सतेज पाटलांचा भाजपवर रोख

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com