'अपघातमुक्त भारत' हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली

Vinayak Mete Passes Away| Nitin Gadkari| शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं.
Nitin Gadkari|Vinayak Mete|
Nitin Gadkari|Vinayak Mete|

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेंटेना कुठलीही मदत मिळाली नाही. एक तासानंतर त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Nitin Gadkari comments on Vinayak Mete)

''रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. पण आता प्रत्येकाने संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण माहिती नाही. पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रीया मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

Nitin Gadkari|Vinayak Mete|
Vinayak Mete : मराठा समाजाचा आवाज हरपला.. मेटेंच्या अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

महाराष्ट्रातल्या विकासकामांमध्ये विनायक मेटे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच अपघाती निधन हे महाराष्ट्राचही नुकसान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन गडकरी यांनी केलं आहे.

याचबरोबर, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील विनायक मेटे यांच्या निधनाबाबत ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक व दुःखद आहे. बीड जिल्ह्यातून राजकीय पार्श्वभूमी नसताना मेटे यांनी विविध आंदोलनातून आपले नेतृत्व सिद्ध केले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.'' असे ट्विट वळसे-पाटील यांनी केलं आहे.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रासाठी ही दुदैवी घटना आहे. मराठा समाजाला न्याय मिळेल,असा त्यांना विश्वास होता.या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे,"

फडणवीस म्हणाले, "आजचा दिवस दुःखद घटनेने सुरु झाला. मेटे हे संघर्षमय व्यक्तीमत्व, नेतृत्व होते. मराठा आरक्षणासाठी त्यांची लढा उभारला. त्यांच्या मोठा अभ्यास मराठा आरक्षणाचा असतो. आजच्या बैठकीबाबत त्यांनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज पाठवला होता. सामान्यासाठी लढणारा नेता हरपला आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com