

Mumbai : गुजरात बेस्ट बेकरी केस प्रकरणाचा मुंबई सत्र न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. बेस्ट बेकरी प्रकरणातील दोन आरोपींची मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हर्षद रावजीभाई सोळंकी आणि मफत मणिलाल गोहिल असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुजरात बेस्ट बेकरी केस प्रकरणी हर्षद रावजीभाई सोळंकी आणि मफत मणिलाल गोहिल गेल्या दहा वर्षांपासून कारागृहात आहेत. सध्या दोन्ही आरोपी आर्थर रोड तुरुंगात असून 13 डिसेंबर 2013 ला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. गुजरात बेस्ट बेकरी केस हे प्रकरण तब्बल 21 वर्षांपूर्वीचं आहे.
2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीनंतर घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेत जमावाने 14 जणांची निर्घृण हत्या केली होती. तसेच यावेळी जमावाने बेकरी जाळण्यापूर्वी त्या ठिकाणी लूटमारही केली होती. 21 वर्षानंतर या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी हर्षद रावजीभाई सोळंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गुजरातच्या वडोदरा येथील बेस्ट बेकरी जमावाच्या हल्ल्यात जाळून टाकण्यात आली होती. या घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी बेकरी मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरुन 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2003 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्ताता केली होती.
झहिरा शेखसह अनेक साक्षीदारांना कोर्टाने फितूर घोषित केलं होतं. त्यानंतर पुढे सत्र न्यायालयाचा हा निकाल गुजरात हायकोर्टानेही कायम ठेवला होता. त्यानंतर झहिराने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुन्हा खटला चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण गुजरातबाहरे चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण मुंबईत वर्ग करण्यात आलं होतं.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.