Aditya Thackeray Vs Gulabrao Patil : '...त्यांच्या बापाला कळलं होतं म्हणून मला मंत्री केलं', आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील विधानसभेत भिडले

Maharashtra budget session Aditya Thackeray Vs Gulabrao Pati : आदित्य ठाकरेंनी यांना खातं कळलं की नाही? असा जहरी सवाल करत गुलाबराव पाटलांवर तोफ डागली. ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात. उपमुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात.
Gulabrao Patil & Aditya Thackeray
Gulabrao Patil & Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray News : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष वरचढ ठरताना दिसतो आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधी पक्षाचा वाढलेला आत्मविश्वासामुळे ते मंत्र्यांना टार्गेट करत आहेत. मंत्र्यांना प्रश्नाची उत्तरे देता येत नाही, असा निशाणा साधत आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना विधानसभेत सुनावले. त्यामुळे ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्या खडाजंगी झाली.

आदित्य ठाकरेंनी यांना खातं कळलं की नाही? असा जहरी सवाल करत गुलाबराव पाटलांवर तोफ डागली. ठाकरे म्हणाले, 'मुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात. उपमुख्यमंत्री स्वतः उत्तर देतात. मात्र, मंत्र्यांच्या (गुलाबराव पाटील) प्रत्येक उत्तरात केंद्र सरकार रँडम आहे. आपले राज्य कृषीप्रधान, इंडस्ट्रीयल राज्य आहे. आपण केंद्राकडे बोटं दाखवून चालणार नाही.'

Gulabrao Patil & Aditya Thackeray
Santosh Deshmukh Case Update : कराड, घुले, आंधळेच्या कोट्यवधीच्या 'रसद'वर घाव; 'मर्सिडीज', 'बीएमडब्ल्यू'सारखी अलिशान 10 वाहनं जप्त

'सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे अनेक प्रश्न आहे. ते त्यांना उत्तर देऊ शकत नाही. माझी विनंती आहे अभ्यास करून उत्तर द्या.', असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला.

आदित्य ठाकरेंच्या यांना खातं कळलं की नाही? या विधानावर गुलाबराव पाटील आक्रमक झाले. त्यांनी आपल्या उत्तरामुळे 'त्यांच्या बापाला मी कळलो होतो म्हणून मला खातं दिलं होतं. हे त्यांना अजून माहिती नाही अजून.', असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला.

गुलाबराव पाटलांची सावरासावर

गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या बापाला कळलो होते, असे म्हटले मात्र, वडिलांऐवजी आपण बाप बोललो हे लक्ष्यात येताच त्यांना सावरासावर केली आणि यांच्या वडिलांना मी कळलो होतो म्हणून मला मंत्री केले, असे म्हटले.

Gulabrao Patil & Aditya Thackeray
Madhi Kanifnath Yatra: सीएम फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा झोपेचं सोंग बाजूला सारतील का..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com