बंडखोरांना पाडण्यासाठी अदित्य ठाकरेंचा प्लॅन तयार

Aditya Thackeray|Eknath Ahinde : शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे.
Aditya Thackeray Latest news
Aditya Thackeray Latest news Sarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray: शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुमारे 40 शिवसेना आमदारांना सोबत घेत बंड केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतील हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला असून हा वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला आहे. दरम्यान बंडखोर आमदारांना पाडण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि राज्यातीस नागरिक उभा आहे. असे आव्हान शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. (Aditya Thackeray Latest Marathi news)

Aditya Thackeray Latest news
बाळासाहेब ठाकरे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार ; संभाजीराजेंचे रोखठोक बोल

अदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेवर संकट वगैरे काही नाही. खूप वर्षांपासून काही जिल्ह्यांमध्ये दबून असलेले लोक होते. त्यांना आता पुढे येण्याची संधी आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, जे बंडखोर आणि फुटीरवादी आहेत त्यांच्यापुढे आता दोनच पर्याय उरलेले आहेत. त्यांच्या आमदारकी रद्द होणार किंवा त्यांना भाजप, प्रहार किंवा मनसेमध्ये जावे लागणार आहे. पण ते काय ठरवतात हा निर्णय त्यांच्यावर आहे. मात्र, इथे प्रत्येक बंडखोराला पाडायला, प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक आणि महाराष्ट्राचा नागरिक उभा आहे, अश्या शब्दात अदित्य यांनी बंडखोरांना इशारा दिला आहे.

Aditya Thackeray Latest news
विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करतील!

गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांमध्ये काही जण आमचे पण आहेत. ते आमच्याशी फोनवर बोलत आहेत. त्यांना परत यायच असून ते आमच्या सोबतच आहेत. काही गेलेल्या आमदारांना असे भासवले जातं आहे की, आपण शिवसेनेसोबतच आहोत. फुटीरवाद्यांना शिवसेनेत जागा नाही. पण काहींना परत यायच आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना आम्ही आमच्या परिवारातले समजत होतो त्यांनी धोका दिला. मात्र मित्र पक्षातील लोक परिवारापेक्षा जास्त खंबीरपणे आमच्या सोबत उभे आहेत. हा विश्वास पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. जे काही सुरू आहे तो खेळ लोकांना समजत असून त्यांना लोक धडा शिवकवतील, अशी टीका अदित्य ठाकरे यांनी केली.

Aditya Thackeray Latest news
मोठी बातमी : शिंदे गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढणार?

तसेच, खाते फेरबदला बद्दस अदित्य ठाकरे म्हणाले की इथून काही पळून गेले त्यामध्ये मंत्री देखील आहेत, मात्र, राज्याची काम करणे कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे. म्हणून मंत्रीपद बदलले असल्याचे त्यांनी सांगितले.

Aditya Thackeray Latest news
सहनशक्ती संपली होती, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले... शंभूराज देसाई

दरम्यान, एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी आता 11 जुलै रोजी होणार आहे. याशिवाय याबाबतच्या पुढील आणखी बाबी स्पष्ट होतील. केंद्र सरकार, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणखी लांबणार आहे.

उपाध्यक्षांना 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी पाठविलेली नोटीशीची मुदत ही आज संपणार होती. या आमदारांनी ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर 11 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही उपाध्यक्षांचे वकिल आर. धवन यांनी दिली. मात्र, त्याला शिवसेनेचे वकिल यांनी अभिषेक मनु संघवी आणि वकिल देवदत्त कामत यांनी अशा प्रकारे उपाध्यक्षांची ग्वाही रेकॅार्डवर घेणे, हे कायदेशीर नसल्याचे सांगितले. हा उपाध्यक्षांच्या कामकाजातील ढवळाढळव ठरेल, असा मुद्दा या दोन वकिलांनी दिला. मात्र धवन यांनी दिलेली ग्वाही मान्य करत न्यायमूर्तींनी 12 जुलै संध्याकाळी साडे पाच पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत वाढवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com