विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करतील!

Mahavikas Aghadi | आमदार मिटकरी यांचा विश्वास
Amol Mitkari
Amol Mitkari

मुंबई : गेल्या सहा-सात दिवसांपासून राज्यातील राजकारणात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) साताऱ्यातील आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांनी एक भाकीत केले होते. महाविकास सरकार (Mahavikas Aghadi) कोसळण्या आधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरातील आषाढी एकादशीची पूजा करतील असे भाकीत जयकुमार गोरे यांनी केले होते. त्याला आता अमोम मिटकरी यांनी उत्तर दिले आहे,

त्यानंतर आज शिवसेनेच्या 16 बंडखोर (Shivsena) आमदारांवरील अपात्रतेची कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैपर्यंतची मुदत दिल्याने आता ठाकरे सरकारच्या विरोधातील शिंदे गटाची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 12 जुलैपर्यंत त्यामुळे बंडखोरांना वेळ मिळाला आहे. या सुप्रीम कोर्टात आज आमदारांच्या अपात्र संदर्भात जी तारीख मिळाली त्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amol Mitkari
मोठी बातमी : शिंदे गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढणार?

'आषाढी एकादशीची महापूजा उद्धव ठाकरेंचं करतील; बंडखोर आमदारांनी 11 जुलै पर्यंत गुवाहाटीतच राहावे, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. येत्या 10 तारखेला आषाढी एकादशी आहे. या दिवशी विठ्ठलाची महापूजा हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचं करतील. तोपर्यंत बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत काय झाडी, काय डोंगर आणि काय हाटिल पाहावे, असा असे ट्विट करत आमदार मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना (Shivsena) यांच्यातील खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झाली. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पाठवलेल्या नोटीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने आमदारांना १२ जुलैपर्यंत वाढीव वेळ दिला आहे.

त्यामुळे आता राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गट राज्यपालांना पत्र देणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक ५ वाजता होणार आहे. यामुळे राज्यातील राजकारण वेगाने फिरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com