Ashadhi Wari :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाच्या पूजेसाठी प्रशासनाचे निवडणूक आयोगाला साकडे

निवडणूक आयोगाच्या परवानगीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Wari) पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी (10 जुलै) पहाटे विठूरायाची शासकीय महापूजा होणार आहे. राज्यातील नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. (Ashadhi Wari 2022)

आचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी परवानगीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. ही परवानगी निवडणूक आयोगाने दिल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यावर येता येणार आहे. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यावर येता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या परवानगीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
ठाकरे सरकारनं मंजूर केलेल्या सर्व निविदा शिंदे सरकारकडून रद्द

काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला अशीच आचारसंहिता असताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजेला परवानगी दिली होती. अशीच परवानगी शिंदे यांना मिळू शकते, अशी चर्चा आहे.

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी( ता. ९) रात्री पंढरपूर येथे पोहोचणार होते. पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह इथे आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या कार्यक्रमाचा समारोप सोहळा होणार आहे.

  2. एकादशी दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

  3. सकाळी अकरा वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती लावणार आहेत.

  4. मुख्यमंत्री रविवारी दुपारी तीन वाजता सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील आणि तेथून शासकीय विमानाने मुंबईला येतील. सायंकाळी साडेचार वाजता मुंबई विमानतळ येथे पोहोचतील, तेथून ठाण्याला जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com