अजितदादांनी शब्द पाळला; MPSC च्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

या परिक्षेसाठी आज (ता. ५ ऑक्टोबर) दुपारी २ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एमपीएससी (MPSC) पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने १७ संवर्गातील २९० पदांसाठी जाहीरात मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एमपीएसीची परीक्षा (MPSC Exam) २ जानेवारी २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. (Advertisement published for MPSC vacancies)

Ajit Pawar
हे तर जालियनवाला बाग हत्याकांडासारखे; लखीमपूर खिरी घटनेचा पवारांनी केला निषेध

या परिक्षेसाठी आज (ता. ५ ऑक्टोबर) दुपारी २ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख २५ ऑक्टोबर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (ता. ३० सप्टेंबर) पर्यंत राज्यातील सर्व विभागांच्या सचिवांना त्यांच्या विभागातील रिक्त जागांची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार एमपीएससीकडून १७ संवर्गातील २९० पदांची जाहीरात काढण्यात आली आहे. रिक्त जागांची माहिती प्राप्त झाल्यानंतर केवळ चार दिवसांत एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमपीएससीचे सदस्य नेमण्यापासून ते रिक्त जागांची जाहिरात काढण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अजित पवार यांनी रोखठोक भूमिका घेतली.

Ajit Pawar
सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजूर

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे

उपजजिल्हाधिकारी १२, पोलिस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६ , गटविकास अधिकारी १५, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहायक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहायक गटविकास अधिकारी १७, सहायक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमि अभिलेख १५ , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर १, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, सहकारी कामगार अधिकारी ५४ पदांसाठी राज्य सेवा परीक्षा २०२१ आयोजित करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com