Gunaratna Sadavarte : आदित्य ठाकरेंविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी शड्डू ठोकला, वरळीतून निवडणूक लढवणार...

Gunratna Sadavarte On Aditya Thackeray : "मागील पाच वर्षाच आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीचा काहीही विकास केलेला नाही. त्यामुळे आता वरळीतील सुज्ञ लोकांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी कायदेशीर वरळीला उभं करण्याचा निर्णय घेतला आहे."
Gunratna Sadavarte, Aditya Thackeray
Gunratna Sadavarte, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Oct : मागील पाच वर्षाच आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीचा काहीही विकास केलेला नाही. त्यामुळे आता वरळीतील सुज्ञ लोकांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी कायदेशीर वरळीला उभं करण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी विविध मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.

तरीही इतर अनेक आघाड्या राज्यात तयार होत आहेत. शिवाय निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या देखील वाढत आहे. अशातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधात मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वरळी मतदारसंघातील लोक मागील पाच वर्षात त्रासलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कार्ट्याने काहीच काम केलंलं नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना ललकारलं आहे. सदावर्ते यांनी आपण वरळीचा विकास करणार असल्याचं आश्वासनही दिलं. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या कार्ट्याने काहीच काम केलंलं नाही. त्यांच्या संदर्भात काही अक्ट्रेसचं जीवन कसं संपलं याबाबतच्या बातम्या फक्त चर्चेत राहिल्या.

Gunratna Sadavarte, Aditya Thackeray
Ankita Patil News : अंकिता पाटलांचं ठरलं; उद्या देणार भाजपचा राजीनामा ?

बाकी काहीही या मतदारसंघात घडलं नाही. त्यामुळे वरळीतील सुज्ञ लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी हे ठरवलेलं आहे की आता कायदेशीर वरळीला उभ करणे आवश्यक आहे. वरळीचा विकास हा अधिकाधिक लोकांना प्रिय आहे आणि म्हणूनच वीर जिजामाता नगर असेल किंवा बीडीडी चाळ, माता रमाई स्मारक असेल या बाबी अत्यंत गांभीर्याने घेऊन विकास होणं गरजेचं आहे.

बिल्डरच्या घशात आठ हजार कोटी घालण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरच नेमून विकास केला जाऊ शकतो असं सांगितलं गेलं. महाविकास आघाडीला विरोध करण्यासाठी त्यांचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी मी काम केलं. तसंच त्यांचा बंद आणि संप मी कसा हाणून काढला हे आपण पाहिलं आहे. मी शरद पवार यांची चलती बंद करून टाकली, असंही ते म्हणाले.

Gunratna Sadavarte, Aditya Thackeray
Assembly Election 2024 : ‘वंचित’ स्वतंत्र लढणार, मतांचा टक्का वाढला तर मविआ, महायुतीलाही फटका

तर सामान्य माणसांनी ठरवलेलं आहे की, मी तिथून निवडणूक लढवावी आणि या सर्व सामान्य कष्टकऱ्यांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाबी लक्षात घेता वीर जिजामाता नगरमध्ये असलेल्या 8000 झोपडीवासियांचा मी विकास करेन", असं आश्वासन देत त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात शड्डू ठोकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com