Ankita Patil News : अंकिता पाटलांचं ठरलं; उद्या देणार भाजपचा राजीनामा ?

Ankita Patil’s Decision Final To Resign from BJP Tomorrow : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच गेल्या काही दिवसापासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार अशी चर्चा इंदापूर मतदारसंघात रंगली आहे.
Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच गेल्या काही दिवसापासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार अशी चर्चा इंदापूर मतदारसंघात रंगली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची गेल्या 15 दिवसात दोन ते तीन वेळा भेट घेतली होती.

त्यामुळे त्यांच्या शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हालचालींना वेग आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे उद्या भाजपचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
National Election Watch: भाजपच्या 75 उमेदवारांचे लीड घटले; गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

गुरुवारी दुपारी अंकिता पाटील यांनी वडील हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. सध्या अंकिता पाटील ठाकरे या पुणे जिल्हा भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे या पदाचा त्या राजीनामा देणार असल्याचे समजते.

येत्या काळात राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाल्यावर अंकिता लवकरच या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे अंकिता पाटील ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार का याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे उद्या होत असलेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
Harshvardhan Patil Video : तीन दिवसातच हर्षवर्धन पाटील करणार एक घाव दोन तुकडे, भाजप की तुतारी?

दरम्यान, मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील सुद्धा उपस्थितीत होत्या. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, कन्या अंकिता पाटील यांनी व्हाट्सअपला तुतारीचे स्टेटस ठेवले असल्याने त्याची इंदापूर मतदारसंघात चर्चा जोरात सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांनीही बॅनरबाजी सुरु केली आहे.

Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
Sharad Pawar : शरद पवार खरेच बोलले..! 'ही' पिढी, अन् तीही पिढी, फरक स्पष्ट आहे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com