Sharad Pawar : आठ दिवसांनंतर शरद पवार यांना रुग्णालायातून डिस्चार्ज

Sharad Pawar : आठ दिवसांनंतर शरद पवार यांना रुग्णालायातून डिस्चार्ज

Sharad Pawar | न्यमोनियाची लागण झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 31 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Published on

Sharad Pawar news मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले.

शरद पवार यांना न्यमोनियाची लागण झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 31 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. पण त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यात आला होता. आज आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Sharad Pawar : आठ दिवसांनंतर शरद पवार यांना रुग्णालायातून डिस्चार्ज
मोठी बातमी : EWS आरक्षणावर शिक्कामोर्तब ; पाचपैकी चार न्यायाधीशांचे एकमत

उपचार सुरु असतानाही शिर्डीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंथन शिबीरालाही त्यांनी हजेरी लावली होती. शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शरद पवार डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डीमध्ये आयोजित पक्षाच्या शिबिरात दाखल झाले. शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही घोषणांच्या निनादात त्यांच स्वागत केलं. रुग्णालयातून आल्यामुळे त्यांच्या हाताला बँडेज होतं. तर आजारपणामुळे चेहऱ्यावर थकवाही दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली होती. दरम्यान. गेल्या वर्षी मार्च महिन्यातब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर 30 मार्चला एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com