Kapil Patil's Post : जयंत पाटलांच्या पराभवानंतर कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत; ‘तेही आमच्यासोबत भाजपसारखेच वागले’

Jayant Patil Defeat In Vidhan Parishad Election : जयंत पाटील यांच्या पराभवानंतर समाजवादी गणराज्य पार्टीचे संस्थापक तथा माजी आमदार कपिल पाटील यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
Mahavikas Aghadi's Leader
Mahavikas Aghadi's LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 13 July : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डावलणे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांच्या पराभवानंतर इंडिया आघाडीत खटके उडू लागले आहेत. जयंत पाटील यांच्या पराभवानंतर समाजवादी गणराज्य पार्टीचे संस्थापक तथा माजी आमदार कपिल पाटील यांची पोस्ट चर्चेत आली आहे. पाटील यांनी ट्विट करत ‘इंडिया आघाडीही छोट्या पक्षांसोबत कशी वागली? भाजपसारखेच?’ असा सवाल केला आहे.

कपिल पाटील (Kapil Patil) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इंडिया आघाडीत (India Aghadi) आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने (BJP) त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण, इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले? भाजपसारखेच? असा सवाल त्यांनी केला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांना समाजवादी गणराज्य पार्टीला एक जागा मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, इंडिया आघाडीतील मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार परस्पर जाहीर केले होते. त्यानंतर नाराज पाटील यांनीही मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक भारतीचे उमेदवार म्हणून सुभाष मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्याच ठिकाणी जयंत पाटील यांची उमेदवार धोक्यात आली होती. नार्वेकरांची उमेदवारी नसती विधान परिषदेची उमेदवारी बिनविरोध झाली असती.

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची मतेही जयंत पाटील यांना मिळाली नाहीत, त्यामुळे पहिल्या फेरीत जयंत पाटील यांना केवळ 12 मते पडली. याशिवाय डावी आघाडी, समाजवादी पार्टीची दोन मतेही जयंत पाटील यांना मिळाली नसल्याचे स्पष्ट हेाते.

Mahavikas Aghadi's Leader
Vidhan Parishad Election Result : विधान परिषदेतील पराभवाची पवार घेणार झाडाझडती; आव्हाडांना ‘सिल्व्हर ओक’वरून भेटीचा सांगावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com