Shivsena News : लोकसभा निवडणुकीनंतर मोठा धमाका, ठाकरे-शिंदे एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना हे मत खाण्यासाठी अशा प्रकारे सेटिंग करतात, असा टोला अंबादान दानेव यांनी आंबेडकरांना लगावला आहे.
Eknath Shinde Uddhav Thackeray
Eknath Shinde Uddhav Thackeraysarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईत तीन जागांवर ठाकरे विरुद्ध शिवेसना सामाना होत आहे. कल्याण, ठाणेच्या जागेवर ही शिंदे गट-ठाकरे गट समोरासमोर असणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहेत. ठाकरे देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, या सगळ्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Prakash Ambedkar News : लोकसभेनंतर अन् विधानसभेपूर्वी राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? आंबेडकरांचा नवा बॉम्ब

प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar म्हणाले आहेत की, एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंचा समझोता झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र आले, तर आश्चर्य वाटायला नको. आंबेडकर फक्त येवढेच बोलून थांबले नाहीत तर शिंदे-ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपसोबत BJP जाणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकरांचा हा दावा ठाकरे गटाकडून खोडण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांना हे मत खाण्यासाठी अशा प्रकारे सेटिंग करतात, असा टोला अंबादान दानेव यांनी आंबेडकरांना लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधील जाहीर सभेत निवडणुकीनंतर शरद पवार हे नरेंद्र मोदींसोबत जाणार असल्याचा देखील दावा केला होता.

उज्ज्वल निकमांवर दबाव?

26/11 हल्ला प्रकरणात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उज्ज्वल निकम यांना विनंती करतो की कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल. आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का ? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीड करू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या का?

Eknath Shinde Uddhav Thackeray
Rohit Pawar News : 'भटकत्या आत्म्या'नं काय काय केलं; रोहित पवारांनी PM मोदींना सगळंच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com