Rohit Pawar News : 'भटकत्या आत्म्या'नं काय काय केलं; रोहित पवारांनी PM मोदींना सगळंच सांगितलं

Narendra Modi Vs Sharad Pawar : मोदी साहेब, दहा वर्षात कांद्याच्या उत्पादन खर्च दुपटीने वाढला असताना तुमच्या काळात 2014 पेक्षा कमी दराने कांदा निर्यात होत आहे. ही परिस्थिती सर्वच पिकाची असल्याचे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Maharashtra Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा आणि द्राक्ष उत्पादकांसाठी मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती सांगताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना खोटी पॅकेज जाहीर केल्याची टीका करत त्यावेळी केंद्रात कृषिमंत्री असलेले शरद पवारांना Sharad Pawar पंतप्रधान मोदींनी लक्ष्य केले. यावर आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना खणखणीत सुनावलं आहे.

शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना कांदा उत्पादकांसाठी केलेल्या आकडेवारी सादर करत, ती मदत मोदी सरकारपेक्षा काकणभर जास्तच असल्याचे रोहित पवार यांनी ट्विटवर केलेल्या पोस्टमध्ये ठासून सांगितले.

मोदीसाहेब, महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्यांच्याबद्दल विचारतात ना की, कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? त्याच कृषिमंत्र्यांनी 2004 ते 2014 या दहा वर्षात कांदा निर्यातीत तब्बल 340 टक्के वाढ केली होती. तुम्ही ज्यांना भटकती आत्मा म्हणतात ना, त्यांनी कृषिमंत्री असताना 714 कोटी रुपयांची निर्यात दहा वर्षांत 3 हजार 169 कोटीपर्यंत नेली. दहा वर्षांपूर्वी पवारांनी सरासरी 21 रुपये किलोने कांदा निर्यात केला. मात्र दहा वर्षानंतर तुम्ही सरासरी केवळ 18 रुपये किलो दराने कांदा निर्यात करत आहात, असा निशाणा साधला आहे.

Rohit Pawar
Akola News: 'आंबेडकरांना मते देऊ नका,' असे मौलवींना सांगणारा काँग्रेस नेता अडचणीत

दहा वर्षात कांद्याच्या उत्पादन खर्च दुपटीने वाढला असताना तुमच्या काळात 2014 पेक्षा कमी दराने कांदा निर्यात होत आहे. ही परिस्थिती फक्त कांदा पिकाची नाही. सर्वच पिकाची आहे. उत्पन्न खर्च दुप्पट-तिप्पट वाढलेला असताना तुम्ही मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र निम्म्याने कमी केले आहे. मोदीजी हीच आहे का तुमची गॅरंटी, असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi भर सभेत एका युवा शेतकऱ्यांनी कांद्यावर बोलण्याची मागणी केली. यानंतर सभेत काहीसा गोंधळ झाला. पंतप्रधान मोदींनी यानंतर जय श्रीरामची घोषणा देत सभेचे स्वतःकडे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणात कांदा आणि द्राक्ष उत्पादनावर भाष्य केले. सभेत घोषणा देणाऱ्या युवा शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गोंधळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा आणि द्राक्ष उत्पादकांसाठी मोदी सरकारने दहा वर्षात काय केले, याची माहिती दिली. ही माहिती देताना त्यांनी काँग्रेस सत्ताकाळात कृषिमंत्री राहिलेले शरद पवार यांना लक्ष्य केले.

Rohit Pawar
Sharad Pawar News : शरद पवारांचे भाषण सुरू असताना बॅनर कोसळले !

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते, काँग्रेस सत्ताकाळात केंद्रात महाराष्ट्रातील कृषिमंत्री होते. असे असून देखील शेतकऱ्यांची त्यांना चिंता नव्हती. काँग्रेसच्या Congress सत्ताकाळात शेतकऱ्यांना खोटी पॅकेज जाहीर केली गेली. कांदा उत्पादाकांना न्याय देण्यासाठी भाजपच्या सत्ताकाळात पहिल्यादांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला. सात लाख मेट्रीक टन कांदा खरेदी केला. आता पुन्हा पाच लाख मेट्रीक टन कांदा बफर स्टॉक करण्याचे नियोजन सुरू आहे. गेल्या दहा वर्षात कांदा निर्यातीत 35 टक्क्यांनी वाढ झाली. कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर गेल्या दहा दिवसांत 22 हजार मेट्रीक टन कांदा निर्यात झाली. ऑपरेशन ग्रीन अंतर्गत कांदा निर्यातीसाठी वाहतुकीवर अनुदान दिले जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar
Beed News: "मला बीडमध्ये येऊ दिलं नाही तर..." मुंडे बहिण-भावाला जरांगे पाटलांचा इशारा; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com