Shambhuraj Desai News : मोहित कंबोजनंतर आता मंत्री शंभूराज देसाईंचा 'मविआ'बाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

Political News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याचे संकेत मिळत असल्याचे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर केले आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या निमिताने सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर टीका करीत वातावरण ढवळून निघाले असतानाच परत एकदा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याचे संकेत मिळत असल्याचे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर केले आहे.

भाजप (Bjp) नेते मोहित कंबोज (Mohit Kambhoj) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना दुजोरा दिला आहे. देसाई यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करताना 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते महायुतीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. (Shambhuraj Desai News)

Shambhuraj Desai
Shivsena News : शिंदे गट ठाकरे गटाच्या एक पाऊल मागेच, जाहीरनामा प्रसिद्ध केलाच नाही

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला आतून मदत केली आहे. त्यामुळे हे मदत करणारे नेते येत्या काळात महायुतीत प्रवेश करणार आहेत. निकाल लागल्यानंतर काय होणार हे तुम्हीच पहा आता कोणत्याच नेत्याचे नाव सांगणार नाही, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील काही मतदार संघातील प्रचाराची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि मुंबईतील प्रचाराचा दौरा केला. सर्वच ठिकाणी महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घणसोलीत ज्या ठिकाणी सातारा-कराड या भागातली नागरीक जास्त राहतात तिथे संयुक्त मेळावा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या रोड शोमुळे पूर्ण वातावरण महायुतीला पोषक असे झाले असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत महायुतीसाठी चांगले वातावरण असल्याचे दिसत आहे. शिंदे सरकारने जी कामगीरी केली त्याची पोचपवाती महाराष्ट्रातील जनतेने गेल्या चार टप्यात दिली आहे. देशातील अनेक मोठ्या शहरात मोदींचे रोड शो केले आहेत. मोठ्या व्यक्तींच्या रोड शोला काही सुरक्षेच्या कारणास्तव उपायोजना कराव्या लागतात. विरोधकांच्या टीकेचा आमच्या विजयावर काही परीणाम होणार नाही, असेही देसाई म्हणाले.

Shambhuraj Desai
Shambhuraj Desai News : शंभूराज देसाईंची तत्परता, प्रचारात व्यस्त असूनही मतदारसंघातील नुकसानीची केली पाहणी...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com