IAS Lobby Meets Devendra Fadanvis : जयस्वाल यांच्यावरील कारवाईनंतर IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीने घेतली फडणवीसांची भेट

Sanjeev Jaiswal News: संजीव जयस्वाल यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाई केली आहे.
IAS Lobby Meets Devendra Fadanvis :
IAS Lobby Meets Devendra Fadanvis : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

IAS Lobby Meets Devendra Fadanvis कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी माजी सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर आता मुंबईतील आयएएस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली. मुंबईतील आयएएस लॉबीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) यांची भेट घेतल्याची माहिती आहे. जयस्वाल यांच्यावर झालेल्या कारवाईने आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीमधये अस्वस्थता पसरल्याने त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात तब्बल साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत ते सर्व पैसे वसूल करणार असल्याचाही इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. कोरोना सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी लाईफ लाईन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर ईडी कारवाई केली.

IAS Lobby Meets Devendra Fadanvis :
KCR On Maharashtra Tour : पुष्पवृष्टीची परवानगी नाकारली; 'केसीआर' एकटेच घेणार दर्शन, 'असा' असणार दिनक्रम

या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याचंही सांगण्यात आलं. जयस्वाल यांच्यावरील कारवाईमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरल्याचही सांगण्यात येत होत. सत्तासंघर्षात अधिकाऱ्यांचा बळी जात असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.