BJP-Shivsena News : मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा 'भाजपा - शिवसेना' युतीच सत्तेत,आघाडीला धक्का; नव्या सर्व्हेतील दावा...

Mahavikas Aaghadi : फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती तर शिंदेंना..
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. बैठका, दौरे, मेळावे, आऊटगोईंग आणि इन्कमिंगलाही वेग आला आहे. याचवेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीतील विजयाचा दावा केला जात आहे. मात्र, एका राज्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीतीच सत्ता येणार असल्याचं समोर आलं आहे. तसेच युती बहुमताचा आकडा सहज पार करण्याची शक्यताही वर्तवली आहे.

'न्यूज एरेना इंडिया' (News Arena India) या वृत्तसंस्थेनं आजच्या घडीला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कोण किती जागा जिंकणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे. यात भाजपला जवळपास १२३ ते १२९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचं दावा केला आहे. यात शिंदे गटाला २५ तर ठाकरेंना १७ ते १९ जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीला ५५ ते ५६ आणि काँग्रेसला ५० ते ५५ जागा मिळणार असल्याचं दावा केलं आहे. याबाबतचं ट्विट केलं आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
News Arena India Survey : भाजपला सर्वाधिक जागा; मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ३५ टक्के जनतेची पसंती

भाजप युतीला स्पष्ट बहुमत..?

राज्यात आजमितीला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपा १२३-१२९, शिवसेना (शिंदे गट) २५, राष्ट्रवादी : ५५ ते ५६, काँग्रेस ५० ते ५५, शिवसेना (ठाकरे गट) 17-19, आणि इतर १२ असा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली आहे. असा दावा 'News Arena India'या वृत्तसंस्थेनं केला आहे. मागील वर्षी शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधारी पक्षांना निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं जातं. मात्र, आता निवडणुका झाल्यातर पुन्हा भाजप शिवसेना युतीलाच जनतेनं कौल दिला आहे.

शिंदे गट ठाकरेंना वरचढ ठरणार...

न्यूज एरेना इंडिया या वृत्तसंस्थेनं आजच्या घडीला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर कोण किती जागा जिंकणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला आहे. यात भाजपला जवळपास १२३ ते १२९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचं दावा केला आहे. यात शिंदे गटाला २५ तर ठाकरेंना १७ ते १९ जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

तर राष्ट्रवादीला ५५ ते ५६ आणि काँग्रेसला ५० ते ५५ जागा मिळणार असल्याचं दावा केलं आहे. मुस्लिम समाज एकसंघपणे एआयएमएमआयच्या पाठीशी उभा राहील, असा अंदाज सांगण्यात आलेला आहे, त्यामुळे एआयएमएमआयच्या जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतचं ट्विट केलं आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Nilesh Lanke News : निलेश लंकेंची विखे पाटलांवर टीका; म्हणाले, "माझी आमदारकी जनता ठरवेल, पण तुमच्या पुत्राची खासदारकी..."

महाराष्ट्रात भाजप(BJP)चा आतापर्यंतचा उच्चांक गाठणार आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे इतरांपैकी कोणीही वाढणार नाही.एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटापेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि पेक्षा तो संपूर्ण महाराष्ट्राचा पक्ष असेल. भाजपा इतर + अपक्ष यांच्यासह 140 च्या आसपास पोहचतील म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यताही या संस्थेनं वर्तवली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागा वाढणार, पण...

त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष त्यांच्या जागांमध्ये किरकोळ वाढ करतील पण बहुमताच्या जवळ जाणार नाहीत. कारण उद्धव ठाकरे आता कोकणाबाहेर मजबूत नसल्याचं म्हटलं आहे. स्थानिक उमेदवारांमुळे भाजप जवळपास 35% जागा जिंकू शकते. काँग्रेसला आघाडीचा सर्वाधिक फायदा होत आहे. आघाडीशिवाय त्यांना 28 जागाही जिंकता येणार नाहीत असल्याचं 'न्यूज एरेना इंडिया' संस्थेंनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) ने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली होणार असली तरी ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळण्याचा अंदाज या संस्थेनं व्यक्त केला आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Satara News : शिवतीर्थाचे पावित्र्य जपणार; देसाईंसोबत जुंपून देण्याचे विकृत प्रवृत्तीकडून प्रयत्न : उदयनराजे

फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंती...

काही दिवसांपूर्वी एका सर्व्हेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती असल्याचं दाखवतानाच देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)ना त्यांच्यापेक्षा कमी दाखवण्याचं प्रयत्न केला होता. यामुळे भाजपा शिवसेना युतीत वादाची ठिणगी पडली होती. युतीतील आरोप - प्रत्यारोपांसह नाराजीनाट्य लपून राहिलं नव्हतं.

अखेर तीन दिवसांनंतर शिंदे व फडणवीसांनी पुढाकार घेत युतीतील वादावर पडदा टाकला होता. मात्र, आता न्यूज एरेना इंडिया संस्थेच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंपेक्षा फडणवीसांना सर्वाधिक पसंती असल्याचं म्हटलं आहे. यात फडणवीसांना ३५ टक्के तर शिंदेंना अवघे १२ टक्के लोकांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com