Dasara Melava : दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाची गाण्यातून भावनिक साद ; शिंदे गटाचंही जोरदार प्रत्युत्तर!

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : राजकीय पक्ष, नेते मंडळी प्रचारासाठी देताय विशेष टिझरसह गाण्यांवर भर...
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मयूर रत्नपारखे-

Songs of Political Parties : विजयादशमी अर्थात दसरा उद्यावर येऊन ठेपला असून, सर्वांनाच उद्या (मंगळवारी) दिवसभर होणाऱ्या विविध राजकीय नेते मंडळीच्या सभांची उत्सुकता आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेच्या (ठाकरे गट) दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. कारण, हा पारंपरिक दसरा मेळावा नेहमीच राजकीय वर्तुळापासून ते सर्वसामान्यांसाठी मोठा चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान या मेळाव्यासाठी ठाकरे गटाने तयारीही जय्यत केली आहे.

दसरा मेळाव्यासाठी अगोदर ठाकरे गटाकडून खास टिझर लाँच करण्यात आला, त्यानंतर आता एक गाणंही तयार करण्यात आलं आहे. "पक्ष आपला ठाकरे...चिन्हं आपलं ठाकरे...दैवत आपलं ठाकरे'' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं सध्या चांगलच चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Patole On Maratha Reservation : खोट्या जाहिराती लावत किमान मराठ्यांना फसवू तर नका, नानांनी फटकारले !

एकीकडे ठाकरे गटाने(Uddhav Thackeray) हे गाणं लाँच केल्यानंतर आता दुसरीकडे शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. यंदा देखील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने नवीन टीझर आणला असून, ज्यामध्ये बाळासाहेबांचा आणि एकनाथ शिंदे यांचा आवाज वापरला गेला आहे.

याशिवाय हा दसरा मेळावा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेचा आहे, असं सांगितलं गेलं आहे. यामुळे आता या दोन्ही गटांमध्ये सध्या टिझर वॉरही पाहायला मिळत आहे.

हे पाहिल्यावर आपल्या लक्षात एक गोष्ट आल्याशिवाय राहत नाही, ती म्हणजे राजकीय पक्ष किंवा नेतेमंडळी आपल्या प्रचारासाठी विशेष पद्धतीने तयार करून घेतलेल्या गाण्यांचा, टिझरचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण आतापर्यंत कोणत्या राजकीय पक्षाने किंवा नेत्याने प्रचारासाठी कोणतं गाणं वापरलं यावर एक नजर मारू या.

१. शिवसेना...शिवसेना...शिवसेना

२.आज रंग राष्ट्राचा, भगवा महाराष्ट्राचा - शिवसेना (ठाकरे गट)

३. तुमच्या राजाला साथ द्या... - मनसे

४. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी... - राष्ट्रवादी काँग्रेस

५. एक मुखाने चला देऊयात आता..मोदीजींना साथ - भाजपा

६. हात लय भारी, काँग्रेस लय भारी - काँग्रेस

याशिवाय, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, परिणय फुके या नेत्यांनीही प्रचारासाठी गाण्यांचा वापर केलेला आहे. ज्यासाठी अवधूत गुप्ते यांनी गाणं गायलेलं आहे. या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही काही नेते स्थानिक गीतकार, गायकांकडून प्रचारासाठी गाणी तयार करून घेताना निवडणूक कालावधीत प्रकर्षाने दिसतात. (Dasara Melava)

राजकीय पक्ष आणि गाणे -

राजकीय स्फूर्तिगीतं अथवा मुद्रागीतं करणं हे संगीतकारासाठी अत्यंत आव्हानात्मक तरी सृजनात्मक समाधान देणारं काम आहे. राजकीय गीत म्हणजे अवधूत गुप्तेने केलेलं शिवसेनेचं पक्षगीत ! मुखड्यामध्ये चढत्या क्रमाने ऊर्जा एकत्रित करत जायची आणि मग हुकलाइनला त्या ऊर्जेचा कळस गाठायचा हा बहुतांश राजकीय गाण्यांचा फॉर्म्युला असतो.

शिवसेनेच्या गाण्यात हा फॉर्म उत्तम वापरला आहे. अनेकदा गाणं एका पक्षासाठी असलं तरी ते इतकं लोकप्रिय होतं की दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्तेही तेच गाणं त्यांच्या रील्समध्ये वगैरे वापरतात.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Ajit Pawar News : अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताना शिंदे -फडणवीसांसमोर ठेवली होती 'ही' अट !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com