Maharashtra Politics : मोठ्या पक्षाला खिंडार, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षाने हाती घेतले 'घड्याळ'!

Sameer Sheikh Joins NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईचे एआयएमआयएमच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
Sameer Sheikh Joins NCP: MIM District President Enters Party in Presence of Sunetra Pawar
Sameer Sheikh Joins NCP: MIM District President Enters Party in Presence of Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

NCP News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन आज आहे. या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला पक्षाला खूश खबर मिळाली. महाराष्ट्रात वेगाने पसरत असलेल्या एआयएमआयएम पक्षाला नवी मुंबईत खिंडार पाडण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात नवी मुंबई एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, तुर्भे शहराध्यक्ष सद्दाम राईन, असलम कुरेशी यांच्यासह अन् पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा झाला. त्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, नवी मुंबईतील अन्य पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दर्शवला. त्यांच्या सहभागामुळे पक्ष संघटनेला नवे बळ मिळणार आहे.

पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि स्व: अजितदादा पवार यांनी उभ्या केलेल्या जनसंपर्क व सर्वसमावेशक राजकारणाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत.

पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी माजी मंत्री अनिल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भरत जाधव, युवक अध्यक्ष इंदर शेडगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Sameer Sheikh Joins NCP: MIM District President Enters Party in Presence of Sunetra Pawar
Maharashtra School Reopening: शिक्षण संचालकांची विनंती कोर्टाने फेटाळली; विदर्भातील शाळा आता 30 जूनलाच सुरू होणार

वर्धापन दिन उद्या साजरा होणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्लीत आहेत. वर्धापन दिना निमित्त त्यांनी दिल्लीतील कार्यालयात ध्वजारोहन केले. दरम्यान, वर्धापन दिना निमित्त उद्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सोहळा पार पडला. उद्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा सोहळा संपन्न होणार आहे.

Sameer Sheikh Joins NCP: MIM District President Enters Party in Presence of Sunetra Pawar
Rupali Chakankar : खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर SIT कडून 45 प्रश्नांचा मारा; स्वत: IPS तेजस्वी सातपुते यांनी विचारले प्रश्न..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com