Video Ajit Pawar : अजितदादांच्या मनात नेमकं काय? अमित शहांच्या दौऱ्यात अनुपस्थित

Amit Shah Mumbai Tour: अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले त्यावेळी स्वागतासाठी अजित पवार गैरहजर होते. अमित शाह हे मुख्यमंत्री निवास्थान वर्षावर आले होते तेव्हा देखील अजित पवार तेथे नव्हते.
Amit Shah | Ajit Pawar
Amit Shah | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी (ता.8) अमित शाह हे मुंबईत आले. त्यावेळी बारामतीमध्ये असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले. अमित शाह यांची भेट घेण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवार अमित शाह यांच्या दौऱ्यात कुठे दिसलेच नाहीत.

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमासाठी अमित शाह रविवारी उपस्थित होते. आज (सोमवारी) अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच काल त्यांनी पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.

अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले त्यावेळी स्वागतासाठी अजित पवार गैरहजर होते. अमित शाह हे मुख्यमंत्री निवास्थान वर्षावर आले होते तेव्हा देखील अजित पवार तेथे नव्हते. अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी भेट देत गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी देखील मुख्यमंत्री शिंदे तेथे उपस्थित होते. मात्र, अजित पवार अनुपस्थित होते.

Amit Shah | Ajit Pawar
Rahul Gandhi : भारत जोडोमुळं मिळालं यश; राहुल गांधी आता स्वतःला तीन पैलूवर तपासणार, ती कोणकोणती?

अजितदादांच्या मनात काय?

अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना बारामतीमधून दुसऱ्या आमदार लढण्याविषयी वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात असणार की नाही, याविषयी चर्चा सुरू झाल्या. त्यात अजित पवार मुंबईत असूनही अमित शाह यांच्या दौऱ्यात दिसले नाहीत.

त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय? या विषयी देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान अजित पवार अमित शाहांच्या दौऱ्यात कुठे दिसले नसले तरी महायुतीच्या नेत्यांसोबत शाह यांनी विमानतळावर बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार उपस्थित असल्याची माहिती आहे.

Amit Shah | Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांची खदखद अन् 'गब्बर'चा बारामतीकरांना सवाल; वहिनींना पराभूत केलं आता...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com