Uttam Jankar : निवडणुकीत कोब्रा, फितूर म्हणणाऱ्या उत्तम जानकरांना अजितदादांची भूरळ; सत्तेच्या मायाजालामुळे केले तोंड भरून कौतुक!

NCP Political News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत तोंडसुख घेतले होते. खुद्द बारामतीत जाऊन जानकरांनी अजित पवारांचा समाचार घेतला होता.
Uttam Jankar-Ajit Pawar
Uttam Jankar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 May : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत तोंडसुख घेतले होते. खुद्द बारामतीत जाऊन जानकरांनी अजित पवारांचा समाचार घेतला होता. अजितदादांना कोब्रा, फितूर म्हणणारे उत्तमराव सत्तेच्या मायाजालामुळे आता अजितदादांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे दिसून येत आहे. सत्तेत असणाऱ्या अजितदादांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमदार जानकर हे भारावून गेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारसभांत अजित पवारांवर तुटून पडणारे जानकर हेच आहेत का, असा प्रश्न पडावा, असा फरक आमदार जानकरांच्या वागण्यात दिसून येत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ताज्या विधानावरून होत आहे. मात्र, एकत्रिकरणाचा चेंडू त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला आहे. पण या एकत्रिकरणाच्या चर्चेला सुरुवात कुठून झाली, याचा भांडाफोड आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून आपण सत्तेत गेलो पाहिजे अशी भूमिका मांडली. ती जयंत पाटील यांनी पवारांपर्यंत पोचवली होती, असे खुद्द जानकर यांनी स्पष्ट केले. हे सांगताना जानकरांनी अजितदादांचे तोंड भरून कौतुक केले.

उत्तम जानकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मी सडकून टीका केली होती. तरीही त्यांनी माझा माळशिरस तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवला. त्यांच्या वागण्यामध्ये मला कोणताही बदल जाणवला नाही. केवळ माझ्या आग्रहाखातर अजितदादांनी उजव्या कालव्याला पंधरा दिवस अगोदर पाणी सोडले होते.

Uttam Jankar-Ajit Pawar
फडणवीसांच्या निकटवर्तीयाच्या विरोधात शिंदेंची जमावाजमाव; माजी आमदाराच्या घरातून मिळणार चॅलेंज...

पाणी प्रश्नाव्यतिरिक्त आणखी चार ते पाच कामांसंदर्भात मी अजित पवार यांच्याकडे गेलो होते. त्या त्या वेळी ते मला माझ्याबाबत सकारात्मक वाटले. टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार आपल्याला सामावून घेणार का, याबाबत मनात साशंकता होती. पण, मधल्या काळात ज्या ज्या वेळी भेटी झाल्या, त्या त्या वेळी अजितदादांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका आम्ही मांडल्याचे जानकर यांनी सांगितले.

एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत आक्रमपणे अजित पवार यांच्या टीकास्त्र सोडणाऱ्या उत्तम जानकर यांना सत्तेशिवाय विकासकामांबाबत पान हालत नाही, हे लक्षात येताच त्यांनी अजित पवारांसोबत जुळवून घेतल्याचे दिसून येत आहे, त्यातूनच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Uttam Jankar-Ajit Pawar
Dr. shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी टोचले पोलिस अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले, ‘गोपनीय माहिती सोडून....’

उत्तम जानकर यांनी अजितदादांविरोधात केलेली कडवट विधाने

  • अजितदादांनी मला पक्षातून काढून टाकलं, तर मी अजितदादांना पक्षातून काढून टाकेल

  • अजित पवारांचा पराभव करून मी राष्ट्रवादी सोडेन

  • अजितदादा कोब्रा आहे, एकदा कुणाला डसल्यावर कुणाला सोडत नाही. मात्र, मीही मुंगसासारखा चिवट आहे.

  • उत्तम जानकर यांना सामावून घेण्याएवढं अजित पवार यांचे नेतृत्व मोठं आहे का?

  • उत्तम जानकरांना सांभाळून घेणारा अजून कोणता नेता तयार झालेला असेल, असं मला तरी वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com