Ajit Pawar News : मुंडेंना अभिवादन मात्र शरद पवारांना शुभेच्छा नाही; अजितदादांना काकांच्या वाढदिवसाचा विसर?

Ajit Pawar On Sharad Pawar : छगन भुजबळांना आपल्या नेत्याचा विसर...
Ajit Pawar News : मुंडेंना अभिवादन मात्र शरद पवारांना शुभेच्छा नाही; अजितदादांना काकांच्या वाढदिवसाचा विसर?
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा आज 12 डिसेंबर रोजी जन्मदिवस असतो. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असते. राजकीय-सामाजिक विश्वातून या दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. मात्र, शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र सोशल मीडियावर आपल्या काकांना शुभेच्छा दिलेल्या दिसून येत नाही. विशेष म्हणजे त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar News : मुंडेंना अभिवादन मात्र शरद पवारांना शुभेच्छा नाही; अजितदादांना काकांच्या वाढदिवसाचा विसर?
Sharad Pawar : वाढदिवसाला शरद पवार यांना नाशिककरांनी दिली अनोखी भेट!

अजित पवार यांनी आपले काका शरद यांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या नसल्या तरी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण केले आहे. ट्विट करत अजित पवार म्हणाले, "स्वकर्तृत्वानं राजकारण आणि समाजकारणाच्या वर्तुळात स्वतःची एक दिलदार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"

गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करतानाच अजित पवारांना आज शरद पवार यांचा वाढदिवस असतो याचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित होत आहे. राजकीयदृष्ट्या शरद पवारांशी विलग होऊन शिंदे - फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आपल्या काकांना शुभेच्छा देताना काही राजकीय अडचण निर्माण होत आहे का? असा ही सवाल अजित पवारांच्या बाबतीत आता विचारले जात आहे.

Ajit Pawar News : मुंडेंना अभिवादन मात्र शरद पवारांना शुभेच्छा नाही; अजितदादांना काकांच्या वाढदिवसाचा विसर?
Nawab Malik Issue : नवाब मलिकांशी अजित पवार गटाचा संबंधच नाही; प्रफुल पटेलांचे मोठे विधान

छगन भुजबळांनाही विसर -

अजित पवारांसोबत सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही शरद पवारांना अजूनही शुभेच्छा दिलेल्या नाहीत. मात्र त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माझा मोठा भाऊ असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या आहेत. भुजबळ ट्विट करत म्हणतात, "माझे मोठे बंधू, ओबीसी चळवळीतील माझे पाठीराखा स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!" यामुळे आपले नेते असा नेहमी शरद पवारांचा उल्लेख करणाऱ्या छगन भुजबंळांनाही शरद पवारांचा विसर पडला का? अशी चर्चा होत आहे.

अजित पवार गटातील नेत्यांच्या शुभेच्छा -

अजित पवार गटातील प्रमुख नेते सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षातील नेते यांनी शुभेच्छा दिल्या मात्र अजित पवारांनी वाढदिवसांचं साधं ट्विट का केलं नाही? असा सवाल आता विचारला जात आहे.

पंतप्रधान मोदींच्या पवारांना शुभेच्छा -

आपले राजकीय गुरू असे जाहीर मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख केला होता. आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींना पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आता पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या मात्र अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पवारांना अजूनही शुभेच्छा दिल्या नाहीत, याचीच चर्चा सुरू आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com