मुख्यमंत्री शिंदे, पवार, फडणवीस अन् नार्वेकर एकाच मंचावर; एमसीएत काय होणार

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅनलच्या बैठकीच्या निमित्ताने राजकीय विरोधक एकाच मंचावर आलेले आहेत.
Eknath Shinde, Sharad Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Sharad Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅनलच्या बैठकीच्या निमित्ताने राजकीय विरोधक एकाच मंचावर आलेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार एकत्र आलेले पाहायला मिळाले. शिंदे यांच्या बाजूला शरद पवार तर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला जितेंद्र आव्हाड बसले होते. एमसीए निवडणुकीच्या पूर्वी हे नेते एकत्र आले आहेत.

Eknath Shinde, Sharad Pawar, Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंच्या 'भारत जोडो' यात्रेच्या सहभागावरून भाजपने उडवली खिल्ली, म्हणाले...

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक गुरुवारी होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर एकत्र आलेले होते. गेल्या चार महिन्यातील राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच हे नेते एकत्र दिसले. या निवडणुकीसाठी पवार आणि शेलार यांनी एकच पॅनल उभे केले आहे.

त्यांच्या विरोधात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पॅनल निवडणूक लढवत आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि संदीप पाटील यांच्यात लढत होत आहे.

Eknath Shinde, Sharad Pawar, Devendra Fadnavis
भावना गवळी अन् संजय राठोडांवर, ठाकरेंनी औषध शोधले; दोन नेते लढवणार खिंड

एमसीएचे एकूण ३८० मतदार आहे. त्यामध्ये क्लब्स २११, ऑफिस क्लब्स ७८, स्कूल कॉलेज क्लब्स ४० व माजी कसोटीवीर ५१ असे मतदार आहे. अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राजकारणी विरुद्ध खेळाडू असा सामना होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com