Uddhav Thackeray : पक्षातील नेत्यांवर टीका करणे भोवले; 'या' प्रवक्त्याला उद्धव ठाकरेंनी दाखवला घरचा रस्ता

Uddhav Thackeray spokesperson expelled News : विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी निश्चित करावी या कावेबाज व पोटभरू नेत्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र झाले उलटेच. तिवारी यांनाच घरचा रस्ता दाखवण्यात आला.
Uddhav Thackeray On Reservation
Uddhav Thackeray On ReservationSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. उद्धव सेनेचे अनेक नेते त्यांना सोडून चालले आहेत. काहींना थोपवण्याचे प्रयत्न केले जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना देशपातळीवर वाचा फोडणारे आणि मीडियातून उद्धव सेनेची बाजू मांडणारे विदर्भातील प्रवक्ते किशोर तिवारी यांची मात्र तडकाफडकी उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बोलण्यास परखड असलेल्या तिवारींना आपल्या पक्षातील नेत्यांवर टीका करणे चांगलेच भोवले आहे. मीडियातील एका डिबेटमध्ये त्यांनी विनायक राऊत, अरविंद सावंद आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीचा ताबा घेतला आहे.

हेच नेते जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडत आहेत. त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी निश्चित करावी या कावेबाज व पोटभरू नेत्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र झाले उलटेच. तिवारी यांनाच घरचा रस्ता दाखवण्यात आला.

Uddhav Thackeray On Reservation
Uddhav Thackeray strategy : उद्धव ठाकरेंची 'ती' रणनीती गळती रोखणार; शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी 'हा' खास प्लॅन

किशोर तिवारी तसे चळवलीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विदर्भातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दखल त्यांनी केंद्र व राज्य सरकारला घ्यायला भाग पाडली होती. रोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडेच ते जाहीर करायचे. केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जामाफी जाहीर केली होती.

तिवारी यांच्या साततत्याच्या तग्याद्यामुळे केंद्राला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला होता. राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांना शेतकरी मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बाहेर आंदोलने करणे, सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणे आणि प्रत्यक्षात काम करणे यात किती फरक आहे हे या निमित्ताने तिवारी यांना सरकारने जाणीव करून दिली होती.

Uddhav Thackeray On Reservation
Chhagan Bhujbal : 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना' म्हणणारे छगन भुजबळ राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होणार का ?

पाच वर्षे शेतकरी मिशनची जबाबदारी सांभाळल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सातत्याने बोलायची आणि टीकाटीपणी करण्याची सवय असलेल्या तिवारींनी प्रवक्तेपद मागून घेतले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर तिवारी यांच्या वक्तृत्वाला चांगलीच धार आली होती. राष्ट्रीय चॅनेलवर होणाऱ्या डिबेटमध्ये ते सातत्याने झळकत होते. मोदींपासून तर देवेंद्र फडणवीस यांच्या टीकाटीपण, आरोप ते करीत होते.

Uddhav Thackeray On Reservation
BJP CM in Delhi : मोदी-शाह ‘ती’ चूक करणार नाहीत! मुख्यमंत्रिपदाचे 52 दिवस, 27 महिने, 31 महिने...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाचे गुणगाण करीत होते. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख शिलेदारांवरच ते घसरल्याने त्यांची हकालपट्टी निश्चित मानली जात होती. उद्धव सेनेच्यावतीने कुठलीही तमा न बाळगता त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मूळचे भाजपचेच असलेले तिवारी आता कुठल्या पक्षात जातात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray On Reservation
Delhi BJP Strategy : दिल्लीत राजस्थानप्रमाणे भाजपचे धक्कातंत्र; आणखी दोन वेगळ्या पॅटर्नची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com